नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर : टीम इंडियाला दिग्गज क्रिकेटपटू देणारे महान कोच तारक सिन्हा (Tarak Sinha) यांचं दीर्घ आजारामुळे निधन झालं आहे. ते 71 वर्षांचे होते. त्यांच्या कोचिंगमध्ये तयार झालेल्या 12 क्रिकेटपटूंनी भारतीय टीमचं प्रतिनिधित्व केलं आहे. तर 100 पेक्षा जास्त क्रिकेटपटू फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले आहेत.
द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या तारक सिन्हा यांच्या निधनाची बातमी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली यांनी ट्विट करुन दिली आहे. त्यांच्या निधनानं क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रासह (Aakash Chopra) अनेकांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Legendary coach Tarak Sinha passed away at 3 an this morning. he was ailing for some time. Om Shanti 🕉️ pic.twitter.com/AFJDwZl6r9
— Vijay Lokapally (@vijaylokapally) November 6, 2021
Ustaad Ji is no more. Dronacharya Awardee. Coach to over a dozen India Test cricketers. And scores of first-class cricketers. Both men and women. Without any institutional help. Your service to Indian cricket will be remembered, sir. May your soul R.I.P. Om Shanti 🙌🙏 pic.twitter.com/fDmvdJC8vZ
— Aakash Chopra (@cricketaakash) November 6, 2021
टीम इंडियासाठी घडवली फौज
भारतीय क्रिकेटमधील महान कोच अशी सिन्हा यांची ओळख होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले रिंदर खन्ना, रंधीर सिंह, रमन लांबा, मनोज प्रभाकर, अजय शर्मा, केपी भास्कर, अतुल वासन, आशीष नेहरा, संजीव शर्मा, आकाश चोप्रा, शिखर धवन आणि ऋषभ पंत हे 12 खेळाडू टीम इंडियाकडून खेळले आहेत. त्याचबरोबर महिला क्रिकेटपटूंमध्ये अंजूम चोप्रालाही त्यांनी मार्गदर्शन केले होते.
IND vs SCO: टीम इंडियानं मॅचनंतर मनंही जिंकलं, स्कॉटलंडला दिलं Surprise Gift
तारक सिन्हा दिल्ली क्रिकेट टीमचे कोचही होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीनं 1985-86 साली रणजी ट्रॉफी स्पर्धा जिंकली होती. त्याचबरोबर 2001-02 साली ते भारतीय महिला टीमचे हेड कोच होते. त्यांच्या कारकिर्दीमध्ये मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news