इरफान पठाणसह 100 खेळाडूंना काश्मीर सोडण्याचे आदेश!

इरफान पठाणसह 100 खेळाडूंना काश्मीर सोडण्याचे आदेश!

जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनने जवळपास 102 क्रिकेटपटूंना काश्मीर सोडण्यास सांगितल्याचं म्हटलं आहे.

  • Share this:

श्रीनगर, 04 ऑगस्ट : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याने सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अमरनाथ यात्राही रद्द करण्यात आली असून सर्व यात्रेकरू, पर्यटकांना जम्मू काश्मीरमधून आपआपल्या राज्यात जाण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान, जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशननं भारताचा क्रिकेटपटू इरफान पठाण आणि त्याच्यासोबत 100 हून अधिक खेळाडूंना काश्मीर सोडण्यास सांगितलं आहे. इरफान पठाण आणि त्याचासोबत असलेल्या सपोर्ट स्टाफमधील इतर लोक आजच तिथून परत येतील. काश्मीरमधील लोकांनीच तिथं थांबावं असा आदेश सरकारकडून देण्यात आला आहे.

याबाबत जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बुखारी यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, कँपमध्ये असलेल्या जवळपास 102 खेळाडूंना परत पाठवलं आहे. इथली परिस्थिती तणावपूर्ण असून काय चाललं आहे हे कळत नाही. इथं होणाऱ्या क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर स्पर्धा घेतली जाणार आहे.

ऑगस्ट महिन्यापासून घरेलू क्रिकेट सामने सुरू होणार होते. जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशननं राज्यातील क्रिकेटर्सच्या निवडीसाठी आणि प्रशिक्षणासाठी शिबिर भरवलं होतं. यामध्ये अंडर 23 आणि वरिष्ठ गटातील खेळाडूंचे आठ संघ तयार करण्यात आले होते.

17 ऑगस्टपासून दुलीप ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफी, देवधर ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी होणार आहे. रणजी ट्रॉफीच्या लीग राउंडला 9 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. 2019-20 च्या घरेलू सत्रात सर्व प्रकारात मिळून 2 हजार 36 सामने होणार आहेत. यात काही सामने जम्मू काश्मीरमध्ये होणार होते.

राज्यात पावसाचा धुमाकूळ, येत्या 48 तासांत 'या' जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा, महत्त्वाच्या टॉप18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 4, 2019 06:50 PM IST

ताज्या बातम्या