News18 Lokmat

वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार देश सोडण्याच्या तयारीत, निवृत्तीनंतर जाणार परदेशात

सध्या अनेक दिग्गज क्रिकेटपटू निवृत्ती घेण्याच्या विचारात आहेत. यामध्येच लंकेच्या लसिथ मलिंगाने देश सोडण्याची तयारी केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2019 07:57 AM IST

वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार देश सोडण्याच्या तयारीत, निवृत्तीनंतर जाणार परदेशात

श्रीलंकेला 2014 मध्ये आयसीसी क्रिकेट वर्ल्ड टी 20 चॅम्पियन करणारा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा लवकरच देश सोडू शकतो. लसिथ मलिंगाला ऑस्ट्रेलियात परमनंट रेसिडेंसी मिळाली असून तो कुटुंबासोबत तिथे रहायला जाण्याची शक्यता आहे.

बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत लसित मलिंगा खेळणार असून त्यानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेईल अशी चर्चा आहे.

मलिंगाचे वय 35 असून तो प्रशिक्षक म्हणून यापुढे क्रिकेटमध्ये राहणार असल्याचं समजतं. ऑस्ट्रेलियात कोणत्याही संघाचा तो प्रशिक्षक होऊ शकतो असं म्हटलं जात आहे.

मलिंगाने याआधी 2018 मध्ये मुंबई इंडियन्सचा गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे. त्यानंतर 2019 मध्ये तो खेळाडू म्हणून मैदानात उतरला होता.

लंकेकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये 335 विकेट घेण्याची कामगिरी त्याच्या नावावर आहे. याशिवाय कसोटीत 101 तर टी20 मध्ये त्याने 97 विकेट घेतल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 22, 2019 07:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...