S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

लारा दत्तामुळे महेश भुपतीची मेहनत गेली 'पाण्यात' !

तेव्हा लाराने चक्क महेश भुपतीचे टॉवेलचं दारात ठेवले ज्याने पावसाचे पाणी आत शिरणार नाही. गंमत म्हणजे...

Sachin Salve | Updated On: Aug 30, 2017 02:52 PM IST

लारा दत्तामुळे महेश भुपतीची मेहनत गेली 'पाण्यात' !

30 ऑगस्ट: मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईला चांगलंच झोडपलं. अनेकांच्या घरातही पाणी शिरलं. पावसापासून घर वाचवण्यासाठी महिला कुठल्याही शकला लढवतात पण पावसापासून घराचं रक्षण करतात. अशीच एक शक्कल काल महेश भुपतीच्या पत्नीने म्हणजे अभिनेत्री लारा दत्ताने लढवली.

तर झालं असं की, पावसामुळे पाणी घराच्या आत शिरण्याची भीती होती. तेव्हा लाराने चक्क महेश भुपतीचे टॉवेलचं दारात ठेवले ज्याने पावसाचे पाणी आत शिरणार नाही. गंमत म्हणजे हे

टॉवेल काही साधेसुधे टॉव्हेल्स नव्हते. तर महेश भुपतीने आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धांमध्ये खेळताना वापरलेले टॉवेल्स होते, गंमत म्हणजे लाराने ही गोष्ट ट्विटवर ट्विट केली. आणि त्यात ती म्हणते की युएस ओपन, विंबल्डन आणि ऑस्ट्रलिया ओपनचे टॉवेल्स सद्कारणी लागले.अर्थातच महेश भूपती यावर भडकला आणि याला ट्विटरवर उत्तर देताना त्याने राग दर्शवलाही. पण अशातही दोघांनी मुंबईकरांना सुरक्षित राहायला सांगितलं. मुंबईच्या पावसाच्या फेऱ्यातून काल सेलिब्रिटीजही सुटले नाही असं दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 30, 2017 02:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close