Home /News /sport /

जयवर्धेने-संगकारा श्रीलंकन नागरिकांच्या बाजूनं मैदानात, सरकार विरूद्ध लगावला 'स्ट्रेट ड्राईव्ह'

जयवर्धेने-संगकारा श्रीलंकन नागरिकांच्या बाजूनं मैदानात, सरकार विरूद्ध लगावला 'स्ट्रेट ड्राईव्ह'

श्रीलंका सर्वात मोठ्या आर्थिक संकटातून सध्या जात आहे. श्रीलंकेतील या परिस्थितीवर दिग्गज क्रिकेटपटू कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांनीही आवाज उठवला आहे.

    मुंबई, 4 एप्रिल :  श्रीलंका सर्वात मोठ्या आर्थिक संकटातून सध्या जात आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी देशात अणिबाणी तसंच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. श्रीलंकेतील सामान्य नागरिक सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. देशातील ही परिस्थिती ओळखून दिग्गज क्रिकेटपटू महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा देखील इमोशनल झाले आहेत. मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) कोच असलेल्या महेला जयवर्धने यांनी सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहून देशातील परिस्थितीमुळे आपण खूप दु:खी असल्याचं सांगितलं आहे. 'सरकार लोकांच्या गरजांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. त्यांना विरोध करण्याचा अधिकार आहे. हा विरोध करणाऱ्या नागरिकांना जेलमध्ये घलणे योग्य नाही. मला त्या शूर वकिलांचा अभिमान आहे, जे या लोकांच्या बचावासाठी पुढे आले आहेत. प्रामाणिक नेते लोकांची टीका सहन करतात.' या शब्दात जयवर्धने यांनी श्रीलंकन सरकारला सुनावले आहे. जयवर्धने पुढे म्हणाला की, 'ही समस्या मानवनिर्मित आहे. ती योग्य लोकांच्या माध्यमातून ठीक होऊ शकते. देशाची अर्थव्यवस्था नियंत्रित करणाऱ्या काही व्यक्तींनी लोकांचा विश्वास गमावला आहे. देशाला विश्वास देण्यासाठी एका चांगल्या टीमची गरज आहे. ही वेळ वाया घालवण्याची नाही. विनम्र होण्याची आहे. बहाणेबाजी करण्याची नाही तर योग्य काम करण्याची आहे.' या शब्दात जयवर्धनेनं सरकारवर टीका केली. राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या कुमार संगकारानं देखील या विषयावर मत व्यक्त केले आहे. 'लोकांची निराशा आणि त्यांचा संघर्ष पाहून ऱ्हदय तुटलं आहे. लोकं त्यांचं मत व्यक्त करत आहेत. त्यांना त्यावर तोडगा निघावा अशी अपेक्षा आहे. तर त्यावेळी काही जण रागाने आणि नाराजीनं प्रतिक्रिया देत आहेत. तर काही जण त्याचा चुकीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा, राजपक्षेच राहणार पंतप्रधान या विनाशकारी व्यक्तिगत आणि राजकीय अजेंड्याला दूर ठेवणे आणि लोकांचं मत समजून घेणे हा श्रीलंकेसाठी योग्य पर्याय आहे. लोकं शत्रू नाहीत. वेळ झपाट्यानं हातामधून निसटत आहे. लोकांच्या भविष्याला वाचवण्याची गरज आहे,' असं मत संगकारानं व्यक्त केलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Sri lanka

    पुढील बातम्या