World Cup फायनल: ओव्हर थ्रोच्या निर्णयावर अंपायर धर्मसेना म्हणाले...

World Cup फायनल: ओव्हर थ्रोच्या निर्णयावर अंपायर धर्मसेना म्हणाले...

अंतिम सामन्यात ज्या पंचांनी चुकीचा निर्णय दिला होता, ते श्रीलंकचे पंच कुमार धर्मसेना यांनी त्यांच्या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

लंडन, 21 जुलै: ICC cricket world cupच्या अंतिम सामन्यात अंपायरच्या एका निर्णयामुळे पूर्ण सामनाच पलटला. शेवटच्या षटकात बेने स्ट्रोक्स दोन धावा घेत असताना मार्टिन गुप्टिलचा थ्रो त्यांच्या बॅटला लागला आणि चेंडू सीमारेषेकडे गेला. त्यानंतर अंपायरनी इंग्लंडला 6 धावा दिल्या. सामना झाल्यानंतर पंचांनी दिलेला हा निर्णय चुकीचा असल्याचे लक्षात आले. आयसीसीच्या नियमानुसार इंग्लंडला 5 धावा देणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात पंचांनी 6 धावा दिल्या. या निर्णयामुळे अखेरच्या चेंडूवर इंग्लंडने एक धाव घेत सामना बरोबरीत सोडवला आणि त्यानंतर अंतिम सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. तेथे देखील दोन्ही संघांनी समान धावा केल्या. मात्र इंग्लंडने सर्वाधिक चौकार मारल्यामुळे त्यांना विजेतपद देण्यात आले. अंतिम सामन्यात पंचांनी केलेल्या या खराब कामगिरीवर अनेकांनी टीका केली. यात चाहत्यासह आजी-माजी क्रिकेटपटूंचा देखील समावेश होता. अंतिम सामन्यात ज्या पंचांनी चुकीचा निर्णय दिला होता. ते श्रीलंकचे पंच कुमार धर्मसेना यांनी त्यांच्या त्या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

संडे टाईम्स या वृत्तपत्राशी बोलताना धर्मसेना यांनी सांगिले की, माझा तो निर्णय चुकीचा होता. टीव्ही रिप्लेवर पाहिल्यानंतर ही गोष्ट माझ्या लक्षात आली. पण मैदानात आमच्याकडे टीव्ही रिप्ले पाहण्याची सुविधा नसते. त्यामुळे मी दिलेल्या निर्णयावर वाईट वाटत नाही. मी त्यावेळी जो निर्णय दिला होता. त्यावर आयसीसीने माझे कौतुक केले आहे. धर्मसेना यांच्या या निर्णयामुळे इंग्लंडला सामना बरोबरीत करण्याची संधी मिळाली. पुढे सुपर ओव्हरमध्ये देखील इंग्लंडने अधिक चौकाराच्या जोरावर बाजी मारली. धर्मसेना यांनी त्यांचा निर्णय चुकीचा असल्याचे मान्य केले असले तरी त्यावर माफी मागणार नसल्याचे म्हटले आहे.

ओव्हर थ्रोवर 6 धावा देण्याआधी न्यूझीलंडच्या डावात तिसऱ्या षटकात हेनरी निकोल्सला धर्मसेना यांनी एलबीडब्ल्यूवर बाद दिले. पण रिव्यूमध्ये तो बाद नसल्याचे आढळले. कारण चेंडू विकेटच्या वरून जात होता. त्यानंतर 23व्या षटकात प्लंकेटचा चेंडू केन व्हिल्यमसनच्या बॅटला लागून विकेटकिपरच्या हातात गेला. पण धर्मसेना यांनी त्याला बाद दिले नाही. यावर इंग्लंडने रिव्यू घेतला आणि व्हिल्यमसन बाद झाला. पुढे 34व्या षटकात मारेयस ऐरामस यांनी मार्क वुडच्या चेंडूवर रॉस टेलर याला एलबीडब्ल्यूवर बाद दिले. पण रिप्लेमध्ये चेंडू विकेटच्या वरून जात होता. त्याआधी मार्टिन गुप्टिलने रिव्यू घेतल्यामुळे न्यूझीलंडकडे रिव्यू शिल्लक नव्हता. त्यामुळे टेलरला मैदान सोडावे लागले.

सेमीफायनलमध्ये देखील धर्मसेने यांनी केली होती चुक

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सेमीफायनलमध्ये देखील धर्मसेना यांनी काही चुकीचे निर्णय दिले होते. 20व्या षटकात इंजेसन रॉय धर्मसेना यांनी बाद दिले होते. पण नंतर रिप्लेमध्ये रॉय बाद नसल्याचे आढळले. तेव्हा इंग्लंडकडे रिव्यू नसल्याने रॉयला मैदान सोडावे लागले आहे. धर्मसेनेच्या या निर्णयावर रॉयने वाद घातला त्यामुळे त्याला डिमेरिट गुण देखील देण्यात आले आणि 30 टक्के दंड लावण्यात आला.

नाट्यगृहाची दुरावस्था, भरत जाधवच्या संतापाचा स्फोट

Published by: Akshay Shitole
First published: July 21, 2019, 7:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading