• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • कोरोना लस घेतल्यानंतर कुलदीप यादव अडचणीत, प्रशासनाचे चौकशीचे आदेश

कोरोना लस घेतल्यानंतर कुलदीप यादव अडचणीत, प्रशासनाचे चौकशीचे आदेश

टीम इंडियाचा बॉलर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) कोरोना लस घेतल्यानंतर अडचणीत आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत.

 • Share this:
  कानपूर, 19 मे: आयपीएल स्पर्धा (IPL 2021) स्थगित झाल्यानं भारतीय क्रिकेटपटूंना सध्या ब्रेक मिळाला आहे. या ब्रेकमध्ये आता सर्व खेळाडू कोरोना लसीचा (corona vaccine) पहिला डोस घेत आहेत. आतापर्यंत विराट कोहली, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, रविंद्र जडेजा, इशांत शर्मा यांच्यासह अनेक प्रमुख खेळाडूंनी करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. या सर्वांनी लस घेतल्यानंतर त्याचा फोटो शेअर करत सर्वांना लस लवकरात लवकर घेण्याचे तसेच कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्व प्रकारचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. टीम इंडियाचा बॉलर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) मात्र लस घेतल्यानंतर अडचणीत आला आहे. कुलदीपला कोरोना लसीचा पहिला डोस देताना व्हीआयपी वागणूक (VIP treatment) दिल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं याचे चौकशीचे आदेश दिले आहेत. कुलदीपनं 15 मे रोजी पहिला डोस घेतल्यानंतर एक ट्विट करत सर्वांना लस घेण्याचं आवाहन केले होते. कुलदीप यादवनं यावेळी एक फोटो देखील शेअर केला होता. त्यामध्ये कुलदीप हॉस्पिटलच्या ऐवजी एका लॉनमध्ये लस घेताना दिसत होता. त्यामुळे त्यानं यासंबंधीच्या नियमांचं उल्लंघन केलं असा आरोप आहे. कानपूरचे जिल्हाधिकारी अलोक तिवारी यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी अतुल कुमार यांना या प्रकरणाची चौकशी करुन लवकरात लवकर रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 'कुलदीप यादवला गोविंद नगरमधील जोगेश्वर हॉस्पिटलमध्ये लस घेण्यासाठी जाणे आवश्यक होते. मात्र त्यानं कानपूर महानगर पालिकेच्या गेस्ट हाऊसमधील लॉनवर लसीचा पहिला डोस घेतला,' अशी माहिती एका अधिकाऱ्यानी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री हे देखील लस घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते. कुलदीपसाठी हा नियम का तोडण्यात आला? असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे. टीम इंडियाला दिलासा, इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेले खेळाडू कोरोनामुक्त कुलदीपचे भविष्य अनिश्चित कुलदीप यादवनं मागच्या सहा महिन्यांमध्ये एक टेस्ट आणि दोन वन-डे मॅच खेळल्या आहेत. बीसीसीआयनं त्याचा करार देखील डाऊनग्रेड केला आहे. आयपीएल स्पर्धेत त्याला कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) प्लेईंग 11 मध्ये जागा मिळाली नाही. त्याचबरोबर इंग्लंड दौऱ्यासाठी देखील त्याची निवड झालेली नाही. त्यामुळे कुलदीपचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भविष्य सध्या अनिश्चित आहे.
  Published by:News18 Desk
  First published: