'मी धोनीची मदत मिस करतो', टीम इंडियाच्या बॉलरनं सांगितला 2 वर्षांचा अनुभव

'मी धोनीची मदत मिस करतो', टीम इंडियाच्या बॉलरनं सांगितला 2 वर्षांचा अनुभव

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी कुलदीप (Kuldeep Yadav) हा भारताचा विदेशातील नंबर 1 स्पिनर असल्याचं जाहीर केलं होतं.

  • Share this:

मुंबई, 12 मे: टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट टीमची निवड झाली आहे. या टीममध्ये भारताचा चायनामन स्पिनर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याची निवड झालेली नाही. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी दोन कुलदीप हा भारताचा विदेशातील नंबर 1 स्पिनर असल्याचं जाहीर केलं होतं. या घोषणेनंतर तो फारसा आंतरराष्ट्रीय  क्रिकेट खेळलेला नाही.  गेल्या दोन वर्षात त्यानं बहुतेक काळ टीमच्या बेंचवर घालवला आहे. इतकंच नाही तर या आयपीएलमध्ये त्याला कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) एकदाही संधी दिलेली नाही. मागच्या दोन वर्षात कुलदीपचं करियर झपाट्यानं उतरणीला लागलं. या सर्व घटनांवर कुलदीपनं पहिल्यांदाच  प्रतिक्रिया दिली आहे.

धोनीला मिस करतो

कुलदीपनं गेल्या दोन वर्षात टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीला (MS Dhoni) मिस करतो असं सांगितलं. " मी काही वेळा धोनीला मिस करतो. त्याच्याकडं (धोनी) मोठा अनुभव आहे. तो नेहमी स्टम्पच्या मागून आम्हाला मदत करत असे. आम्ही तो अनुभव मिस करत आहोत. आता ऋषभ आहे. तो जितका जास्त खेळेल तितके त्याच्याकडून जास्त इनपूट मिळेल. बॉलरला नेहमीच दुसऱ्या बाजूनं प्रतिसाद देणाऱ्या पार्टनरची गरज असते असं मला वाटतं.'' असं कुलदीपनं 'इंडियन एक्स्प्रेस' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

"माही भाई होता तेव्हा मी आणि चहल खेळत होतो. तो गेल्यानंतर मी आणि चहल एकत्र खेळलो नाही. मी तर अगदी मोजक्या मॅच खेळलो आहे. मी त्या काळात हॅट्ट्रिक देखील घेतली. तुम्ही त्या कामगिरीकडं एकत्र पाहिलं तर ती चांगली कामगिरी वाटेल. पण, फक्त माझ्या कामगिरीचा विचार केला तर ती काही वेळा 'अप टू मार्क' नसल्याचं जाणवेल. आम्ही कोणत्या टीमविरुद्ध खेळलो याचा देखील विचार करायला हवा," असं कुलदीपनं सांगितलं.

'माझं करियर विराटमुळेच आहे,' कॅप्टन कोहलीचं कौतुक करताना क्रिकेटपटू इमोशनल

मी इतका खराब आहे?

कुलदीपला कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) या आयपीएल सिझनमध्ये एकाही मॅचमध्ये संधी दिली नाही. 'मी इतका वाईट आहे का? हा प्रश्न त्यावेळी माझ्या मनात आला होता. तो टीम मॅनेजमेंटचा निर्णय होता. मी त्यांना याबाबत काही विचारणे चुकीचे होते. चेन्नईतील पिच टर्न होणार हे माहिती असूनही मी तिथं आयपीएल मॅच खेळलो नाही. ते माझ्यासाठी धक्कादायक होते. पण, मी काहीही करु शकत नव्हतो." अशी खंत कुलदीपनं यावेळी व्यक्त केली आहे.

Published by: News18 Desk
First published: May 12, 2021, 12:15 PM IST

ताज्या बातम्या