मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

कृणाल पांड्याने कॅप्टनसी सोडली, भारतीय खेळाडूनं केला होता गंभीर आरोप

कृणाल पांड्याने कॅप्टनसी सोडली, भारतीय खेळाडूनं केला होता गंभीर आरोप

भारतीय ऑल राऊंडर कृणाल पांड्याला (Krunal Pandya) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) रिटेन करणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. मुंबई इंडियन्सनं त्यांचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी कृणाल पांड्यानं एक मोठा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 27 नोव्हेंबर: भारतीय ऑल राऊंडर कृणाल पांड्याला (Krunal Pandya) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) रिटेन करणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. मुंबई इंडियन्सनं त्यांचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी कृणाल पांड्यानं एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याने बडोदा टीमची (Baroda Team) कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष (Baroda Cricket Association) प्रणव अमीन यांना इमेल पाठवून त्यांनी राजीनामा सादर केला आहे.

का घेतला निर्णय?

कृणाल पांड्याच्या कॅप्टनसीमध्ये बडोदा टीमनं सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. बडोद्याला ग्रुप स्टेजमधील पाचपैकी फक्त 1 मॅच जिंकता आली. या निराशाजनक कामगिरीमुळे त्यांना नॉक आऊट राऊंडमध्ये प्रवेश करण्यीत अपयश आले. त्यातच कृणालचा यावर्षी बडोदा टीममधील सिनिअर खेळाडू दीपक हुडाबरोबर (Deepak Hooda) वाद झाला होता. त्यामुळे त्याने बडोदा टीम सोडून राजस्थानकडून खेळण्यास सुरुवात केली आहे.

कृणाल पांड्याही मुश्ताक अली स्पर्धेतील कामगिरी निराशाजक झाली होती. त्यानं 5 मॅचमध्ये फक्त 87 रन काढले आणि 5 विकेट्स घेतल्या. आगामी विजय हजारे ट्रॉफीसाठी केदार देवधन बडोद्याचा कॅप्टन होण्याची शक्यता आहे, तर भार्गव भट्टची व्हाईस कॅप्टन म्हणून नियुक्ती केली जाऊ शकते.

IND vs NZ: भर मैदानात अश्विन आणि अंपायरमध्ये वाद, द्रविडनं केली मॅच रेफ्रीशी चर्चा

काय झाला होता वाद?

यावर्षी जानेवारी महिन्यात सय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धेत (Syed Mushtaq Ali T20 Tournament) हुडाचा बडोदा टीमचा कॅप्टन आणि टीम इंडियाचा ऑल राऊंडर कृणाल पांड्याशी (Krunal Pandya) वाद झाला होता. त्यामुळे दीपक हुडाने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून माघार घेतली.

कृणाल पांड्याने आपल्याला सरावापासून रोखलं आणि आपल्यासोबत गैरवर्तणूक केली, असा दावा दीपक हुडाने केला होता. याबाबत त्याने बडोदा क्रिकेट असोसिएशनला ई-मेलही लिहिला, ज्यात त्याने कृणाल पांड्याबाबत तक्रार केली. कृणाल पांड्याने शिव्या दिल्यामुळे आपण सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधून माघार घेत असल्याचं त्याने मेलमध्ये लिहिलं होतं. त्यानंतर हुडा आता राजस्थान टीमकडून खेळत आहे.

First published:

Tags: Cricket news, Krunal Pandya