मुंबई, 30 मार्च : भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील तीन वन-डे मॅचची मालिका भारताने 2-1 ने जिंकली. पुण्यात रविवारी झालेल्या तिसऱ्या मॅचमध्ये भारतानं इंग्लंडचा 7 रननं निसटता पराभव केला. या विजयानंतर भारतीय टीममधील सर्व खेळाडूंनी विजेतेपदाच्या करंडकासह फोटोसेशन केले. इंग्लंडला हरवणाऱ्या भारतीय टीममध्ये कृणाल पांड्या (Krunal Pandya) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ही भावांची जोडी देखील होती. पांड्या बंधूंनी देखील विजेतेपदासह यावेळी फोटोसेशन केले.
हार्दिक पांड्या गेल्या काही वर्षांपासून टीम इंडियाचा सदस्य आहे. मर्यादीत ओव्हर्सच्या टीममध्ये हार्दिकनं त्याची जागा निश्चित केली आहे. हार्दिकचा मोठा भाऊ कृणालला यंदा पहिल्यांदाच वन-डे टीममध्ये जागा मिळाली. विजय हजारे ट्रॉफीतील चांगल्या कामगिरीच्या जोरावर कृणालची भारत-इंग्लंड यांच्यातील वन-डे मालिकेत निवड झाली.
कृणालनं देखील ही निवड सार्थ ठरवत पहिल्याच मॅचमध्ये आक्रमक अर्धशतक झळकावले. या अर्धशतकामुळे त्याला संपूर्ण मालिकेत खेळवण्यात आले. साहजिकच आपल्या पहिल्या मालिकेत भारतीय टीम जिंकल्याचा आनंद कृणालला जास्त झाला. हार्दिकसोबत काढलेल्या फोटोमध्ये देखील तो आनंद दिसत आहे.
(हे वाचा-IPL 2021: 'या' कारणामुळे विराट कोहलीला व्हावं लागणार आठवडाभर क्वारंटाईन!)
हा फोटो शेअर करत असताना कृणालला जुने दिवस आठवले. त्याने ताज्या फोटोसोबत आणखी एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये कृणाल आणि हार्दिक हे लहानपणी क्रिकेट स्पर्धेत बक्षिस घेताना दिसत आहेत. हा प्रवास इथून सुरु झाला आणि इथपर्यंत आला आहे, असं कॅप्शन कृणालनं या फोटोला दिलं आहे. कृणालनं शेअर केलेला हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
How it started ➡️ How it’s going pic.twitter.com/TrKELGmqwN
— Krunal Pandya (@krunalpandya24) March 29, 2021
सूर्यकुमार यादवने मानले आभार
कृणाल पांड्या भारतीय टीममध्ये नवा असला तरी तो मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) वरिष्ठ खेळाडू आहे. मुंबई इंडियन्स आणि टीम इंडियातील कृणालचा सहकारी सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) त्याचे आभार मानले आहेत.
(हे वाचा- IPL 2021 : इंग्लड विरुद्धची मालिका गाजवलेले खेळाडू मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये दाखल, पाहा VIDEO )
'केपी माझ्या भावा, मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये पुनरागमन झाल्यानंतर माझ्या खेळाला फायदा झाला. पण मी आलो तेव्हा तुझं बाजूला असणं दिलासादायक होतं. लॉकडाऊनमध्ये झालेल्या आपल्या चर्चा, मी कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावं, यासाठी तुझा आग्रह. माझ्या फिटनेससाठी तू केलेली मदत. माझे धन्यवादही कमी पडतील. या शब्दात सूर्यकुमारनं काही दिवसांपूर्वी कृणालला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Hardik pandya, India vs england, Krunal Pandya, Mumbai Indians, Suryakumar yadav