'मांजरेकर मुंबईबाहेरचा विचार करू शकत नाही, तर हर्षा भोगले...' श्रीकांत यांचा निशाणा

'मांजरेकर मुंबईबाहेरचा विचार करू शकत नाही, तर हर्षा भोगले...' श्रीकांत यांचा निशाणा

भारताचे माजी क्रिकेटपटू क्रिस श्रीकांत (Kris Srikkanth) यांनी संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) आणि हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • Share this:

चेन्नई, 28 ऑक्टोबर : भारताचे माजी क्रिकेटपटू क्रिस श्रीकांत (Krish Srikkanth) यांनी संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांच्यावर टीका केली आहे. संजय मांजरेकर मुंबईबाहेरचा विचार करू शकत नाही, असं श्रीकांत म्हणाले आहेत. मांजरेकर यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या टेस्ट सीरिजसाठी केएल राहुलची निवड करण्यावर आक्षेप घेतले होते, त्यावर श्रीकांत यांनी मांजरेकर यांच्यावर निशाणा साधला.

'केएल राहुलच्या आयपीएलमधल्या कामगिरीवर जर त्याची टेस्ट टीममध्ये निवड होत असेल, तर आपण चुकीचा पायंडा पाडत आहोत,' असं ट्विट मांजरेकर यांनी केलं होतं. पण श्रीकांत यांनी मांजरेकर यांच्यावर टीका केली. चिकी चिका या आपल्या युट्यूब चॅनलवर श्रीकांत बोलत होते.

'संजय मांजरेकरला सोडून द्या, त्याला दुसरं काही काम नाही. राहुलच्या टेस्ट टीममध्ये निवड होण्यावर आक्षेप घेतला जातोय? त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. फक्त संजय मांजरेकरला काही प्रश्न विचारायचा आहे, म्हणून मी त्यावर सहमत होणार नाही. फक्त वाद निर्माण करण्यासाठी असे प्रश्न उपस्थित करता कामा नये. राहुलने सगळ्या फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याचे टेस्ट रेकॉर्ड जाऊन बघा. मांजरेकर काहीही बोलतो,' अशी प्रतिक्रिया श्रीकांत यांनी दिली.

मांजरेकर यांनी राहुलच्या टेस्ट क्रिकेटमधल्या खराब फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले होते. मागच्या 12 टेस्ट इनिंगमध्ये राहुलने एकही अर्धशतक केलं नाही. 2018 साली ओव्हल टेस्टमध्ये इंग्लंडविरुद्ध राहुलने 149 रन केले होते, त्याशिवाय राहुलला मोठी खेळी करता आली नाही. जानेवारी 2018 साली दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून राहुल टेस्ट क्रिकेटमध्ये संघर्ष करत आहे. तेव्हापासून राहुलने 27 टेस्ट इनिंगमध्ये 22.23 च्या सरासरीने रन केले आहेत.

मागच्या वर्षी वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर राहुलला टेस्ट टीममधून डच्चू देण्यात आला होता. श्रीकांत यांचा मुलगा अनिरुद्ध याने मांजरेकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत श्रीकांत यांचं मत विचारलं तेव्हा त्यांनी मांजरेकर यांना टोला लगावला.

'राहुलच्या कामगिरीमध्ये सातत्य नसेल, पण त्याने ऑस्ट्रेलियामध्येच पदार्पण केलं होतं. त्याच टेस्ट सीरिजमध्ये राहुलने शतकही केलं होतं. फास्ट बॉलिंगविरुद्ध तो चांगला खेळतो. संजय मांजरेकर मुंबईबाहेरचा विचार करू शकत नाही. मांजरेकर सारख्यांसाठी सगळं काही मुंबई, मुंबई आणि मुंबईच आहे. त्यांनी मुंबईबाहेरचाही विचार करावा,' असं श्रीकांत म्हणाले.

'रोहित शर्माची टेस्ट टीममधली निवडही वनडे आणि टी-20 क्रिकेटमधल्या कामगिरीमुळे झाली होती. मी बऱ्याच जणांना बघितलं, हर्षा भोगलेला मुंबईशिवाय काहीही माहिती नाही. ते तटस्थ नाहीत, ही अडचण आहे. सूर्यकुमार यादवच्या निवडीबाबत ते बोलत आहेत, पण मी दिनेश कार्तिक आणि अश्विनच्या निवडीबाबत बोलतो का?', असा सवाल श्रीकांत यांनी उपस्थित केला आहे.

Published by: Shreyas
First published: October 28, 2020, 6:08 PM IST
Tags:

ताज्या बातम्या