अष्टपैलू भारतीय क्रिकेटपटू म्हणतो, मला गर्लफ्रेंडची स्माईल आवडते

अष्टपैलू भारतीय क्रिकेटपटू म्हणतो, मला गर्लफ्रेंडची स्माईल आवडते

39 चेंडूत शतक झळकावल्यानंतर त्यानं गोलंदाजी करताना 8 गडी बाद केले. या खेळीनंतर त्याला फलंदाजी आवडते की गोलंदाजी असा प्रश्न विचारला होता.

  • Share this:

बेंगळुरु, 25 ऑगस्ट : कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये झालेल्या एका सामन्यानं लक्ष वेधून घेतलं होतं. यामध्ये कर्नाटकचा अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौतम यानं फलंदाजी करताना तुफान फटकेबाजी तर केलीच पण गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघातील 8 गडी बाद केले.

कर्नाटकात सुरु असलेल्या कर्नाटक प्रिमियर लीगमध्ये बेल्लारी टस्कर्सकडून खेळणाऱ्या गौतमने 56 चेंडूत 7 चौकार आणि 13 षटकारांसह नाबाद 134 धावांची खेळी केली. त्यानंतर गोलंदाजी करताना त्यानं फक्त 15 धावा देत 8 गडी बाद केले. टी 20 च्या इतिहासात गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरीपैकी एक ठरली आहे.

सामन्यानंतर त्याला विचारण्यात आलं की, त्याला फलंदाजी आणि गोलंदाजी यापैकी जास्त काय आवडलं. त्यावर मिश्किल उत्तर देताना कृष्णप्पा गौतमनं म्हटलं की, त्याला गर्लफ्रेंडच्या चेहऱ्यावरची स्माईल आवडली. त्याची अशी कामगिरी आयुष्यात एकदाच होणारी घटना आहे. आणि ही घटना कधीच विसरणार नाही. त्यालाच काय इतर कोणालाही अशा खेळीची अपेक्षा नव्हती.

गौतमच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बेल्लारीने 17 षटकांत 3 बाद 203 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळणाऱ्या शिवमोगाला 133 धावांपर्यंत मजल मारता आली. गौतमनं शिवमोगाच्या 8 फलंदाजांना बाद करून बेल्लारीला 70 विजय मिळवून दिला.

कर्नाटक प्रिमियर लीगच्या इतिहासात गौतमनं सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. याशिवाय गोलंदाजीतही सर्वोत्तम कामगिरी केली. गौतमनं फक्त 39 चेंडूत शतक साजरं केलं. त्यानं नाबाद 134 धावांची खेळी केली. पहिल्यांदा गोलंदाजांचा समाचार घेतल्यानंतर गौतमनं फलंदाजांनाही त्रास दिला.

गौतम आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. तो तुफान फटकेबाजी आणि फिरकी गोलंदाजीसाठी ओळखला जातो. आयपीएलमध्ये अनेकदा त्यानं संघाला तारलं आहे.

SPECIAL REPORT: पूरग्रस्तांसमोर आता नवं संकट; शेतात आणि घरात घुसल्या महाकाय मगरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 25, 2019 08:55 AM IST

ताज्या बातम्या