मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Virat Captainship Controversy: संजय मांजरेकरनं घेतली विराटची बाजू, गांगुलीबद्दल म्हणाला...

Virat Captainship Controversy: संजय मांजरेकरनं घेतली विराटची बाजू, गांगुलीबद्दल म्हणाला...

विराट कोहलीला (Virat Kohli) वन-डे टीमच्या कॅप्टनपदावरून काढून टाकण्याच्या वादात आता  माजी क्रिकेटपटू संजय मांजेरकर (Sanjay Manjrekar) यांनी उडी घेतली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 24 डिसेंबर : विराट कोहलीला (Virat Kohli) वन-डे टीमच्या कॅप्टनपदावरून काढून टाकण्याच्या वादात आता माजी क्रिकेटपटू संजय मांजेरकर (Sanjay Manjrekar) यांनी उडी घेतली आहे. या विषयावर दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) आणि रवी शास्त्री (Ravi Shastri) या माजी क्रिकेटपटूंनी विराटची बाजू घेतली आहे. त्यानंतर मांजरेकर यांनीही याबाबत विराटला पाठिंबा देत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) सुनावले आहे.

मांजरेकर यांनी 'टाईम्स नाऊ'शी बोलताना सांगितले की, 'या विषयावर सार्वजनिक चर्चेची गरज काय आहे मला माहिती नाही. बीसीसीआय अध्यक्षांनी यावर बोलण्याची आवश्यकता नव्हती. हे निवड समितीच्या अध्यक्षाचं काम आहे. भारतीय क्रिकेट प्रशासनात निवड समिची अध्यक्ष हे महत्त्वाचं पद आहे. पण, त्याला योग्य मान दिला जात नाही. ' रिकी पॉन्टिंगला (Ricky Ponting) कर्णधार पदावरून हटवण्यात आले तेव्हा निवड समितीनेच त्याला सर्व गोष्टी स्पष्ट केल्या होत्या, याची आठवण मांजरेकर यांनी यावेळी करून दिली.

वेंगसरकर-शास्त्रींचाही विराटला पाठिंबा

माजी कॅप्टन आणि निवड समितीचे अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी (Dilip Vengsarkar) या प्रकरणात सौरव गांगुलीला सुनावले आहे. 'निवड समितीच्या वतीनं सौरव गांगुलीला बोलण्याची काहीही गरज नव्हती. तो बीसीसीआयचा अध्यक्ष आहे. कॅप्टनच्या नियुक्तीबाबत निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मा यांनी बोलायला हवे होते. कॅप्टनची निवड करणे किंवा त्याला हटवणे हा निवड समितचा विषय आहे. ते गांगुलीचे कार्यक्षेत्र नाही.' असे वेंगसरकर यांनी स्पष्ट केले आहे.

IPL 2022 : 'या' टीमकडून नेहमी खेळण्याची तयारी, शुभमन गिलनं सांगितली चॉईस

तर टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री यांनी हा विषय अधिक चांगल्या पद्धतीने सोडवता आला असता, असे मत व्यक्त केले आहे.  'माझ्या मते विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यातील वाद चांगल्या पद्धतीने सोडवता आला असता. विराट कोहलीनं या विषयावर त्याची बाजू मांडली आहे. आता बोर्डाने (सौरव गांगुली) त्यांची बाजू मांडण्याची गरज आहे.' असे मत शास्त्रींनी व्यक्त केले आहे.

First published:

Tags: Cricket news, Sourav ganguly, Virat kohli