• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • आथिया शेट्टीच्या भावासोबत दिसला केएल राहुल, युझर्सनी दिली भन्नाट प्रतिक्रिया

आथिया शेट्टीच्या भावासोबत दिसला केएल राहुल, युझर्सनी दिली भन्नाट प्रतिक्रिया

टीम इंडियाचा क्रिकेटपटू केएल राहुल (KL Rahul) सध्या लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. या सुट्टीमध्ये तो आथिया शेट्टीचा भाऊ अहान शेट्टी (Ahan Shetty) सोबत वेळ घालवत आहे.

 • Share this:
  लंडन, 11 जुलै: टीम इंडियाचा क्रिकेटपटू केएल राहुल (KL Rahul) सध्या लंडनमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. या सुट्टीमध्ये तो आथिया शेट्टीचा भाऊ अहान शेट्टी (Ahan Shetty) सोबत वेळ घालवत आहे. राहुलनं शनिवारी अहानसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. अभिनेत्री आथिया शेट्टी आणि केएल राहुल (Athiya Shetty and Cricketer KL Rahul)  हे दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याची काही दिवसांपासून चर्चा आहे. हे दोघे सोशल मीडियावर ऐकमेकांचे फोटो शेअर करतात. मात्र त्यांनी अजूनपर्यंत रिलेशनशिपबाबत कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही. राहुलनं अहान शेट्टीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामध्ये त्याला अहानला देखील टॅग केले आहे. त्याचा हा फोटो चांगलाच व्हायरल (Viral) झाला असून त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका युझर्सनं मेहुणे एकत्र अशी प्रतिक्रिया दिली आहे. यापूर्वी इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी आथिया शेट्टीनं राहुलचासोबतचा एक फोटो शेअर केला होता. Wimbledon 2021: 143 वर्षांनंतर घडला इतिहास, क्रिकेटर बनली विम्बल्डनची राणी आथियाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले होते. त्यामध्ये ती बेडवर बसलेली आहे. तो बेड हॉटेलमधील एका रूमचा वाटत असून आथियानं निळ्या आणि फिकट तपकिरी रंगाचे जॅकेट घातले आहे. हा फोटो पाहून आथिया इंग्लंडमध्ये आहे अशी प्रतिक्रिया फॅन्सनी दिली होती.
  Published by:News18 Desk
  First published: