Home /News /sport /

IPL 2022 : KL राहुल ठरला सर्वात महागडा खेळाडू, विराट-रोहितपेक्षाही मिळणार जास्त पगार

IPL 2022 : KL राहुल ठरला सर्वात महागडा खेळाडू, विराट-रोहितपेक्षाही मिळणार जास्त पगार

टीम इंडियाचा ओपनिंग बॅटर केएल राहुल (KL Rahul) आयपीएल 2022 (IPL 2022) मधील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे.

    मुंबई, 22 जानेवारी : टीम इंडियाचा ओपनिंग बॅटर केएल राहुल (KL Rahul) आयपीएल 2022 मधील सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. राहुलला लखनऊ फ्रँचायझीने 17 कोटी दिले आहे. लखनऊनं (Lucknow Team) शुक्रवारी रात्री डाफ्टमध्ये खरेदी केलेल्या 3 खेळाडूंची घोषणा केली. त्यानंतरही ही माहिती समोर आली आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात लखनऊची टीम पहिल्यांदाच खेळणार आहे. लखनऊनं राहुलसह ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर मार्कस स्टॉईनिस 9.2 (Marcus Stoinis) आणि अनकॅप भारतीय खेळाडू रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) यांना 4 कोटींना करारबद्ध केले आहे. यापूर्वीच्या आयपीएल सिझनमध्ये स्टोईनिस दिल्ली कॅपिटल्स तर बिश्नोई पंजाब किंग्ज टीमचा सदस्य होता. झिम्बाब्वेचे माजी कॅप्टन अँडी फ्लॉवर (Andy Flower) हे लखनऊ टीमचे हेड कोच आहेत. तर 2 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणारा कॅप्टन गौतम गंभीर (Gautam Gambhi) हा मेंटॉर आहे. रोहित-विराटपेक्षा महागडा मुंबई इंडियन्सनं कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma) 16 कोटींमध्ये रिटेन केले आहे. रोहितला मागच्या सिझनमध्ये 15 कोटी मिळाले होते. तर आरसीबीची कॅप्टनसी सोडलेल्या विराट कोहलीला (Virat Kohli) 15 कोटी मिळणार आहेत. विराटला मागच्या सिझनमध्ये 17 कोटी मिळाले होते. राहुलला या दोघांपेक्षाही जास्त रक्कम मिळणार आहे. आयपीएल 2022 मधील महागड्या खेळाडूंमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं रविंद्र जडेजा आणि दिल्ली कॅपिटल्सनं ऋषभ पंतला प्रत्येकी 16 कोटींना रिटेन केले आहे. त्याचबरोबर अहमदाबादनं हार्दिक पांड्या आणि राशिद खान यांना प्रत्येकी 15 कोटींमध्ये रिटेन केले आहे. टीम इंडियाच्या बाहेर असूनही हार्दिकला अहमदाबादनं कॅप्टन केले आहे. IPL 2022 मेगा ऑक्शनपूर्वी BCCI च्या 'या' निर्णयाकडे सर्व फ्रँचायझींचं लक्ष राहुलला इतके पैसे का? राहुल टी20 क्रिकेटमधील प्रमुख बॅटर आहे. त्याने मागील 4 आयपीएलमध्ये 575 पेक्षा जास्त रन बनवले आहेत. आयपीएल 2020 मध्ये त्याने 14 मॅचमध्ये 5 अर्धशतकांसह 55.83 च्या सरासरीनं सर्वात जास्त 670 रन केले होते. तर आयपीएल 2021 मध्ये 626 रन करत तिसरा क्रमांक पटकावला होता. त्याचबरोबर राहुल कॅप्टन, ओपनिंग बॅटर आणि विकेट किपर अशी तिहेरी भूमिका पार पाडतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ipl 2022, Ipl 2022 auction, Kl rahul

    पुढील बातम्या