मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

गांगुलीची 10 दिवस मनधरणी केल्यानंतर टीम इंडियाला मिळाला धोनी, वाचा माहीच्या निवडीची Untold Story

गांगुलीची 10 दिवस मनधरणी केल्यानंतर टीम इंडियाला मिळाला धोनी, वाचा माहीच्या निवडीची Untold Story

टीम इंडियाचाच नाही तर जगातील बेस्ट कॅप्टनमध्ये महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) समावेश होतो. भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलाऱ्या धोनीची टीम इंडियामध्ये निवड सहजासहजी झालेली नाही. त्याला संधी मिळावी म्हणून 10 दिवस प्रयत्न करावे लागले होते.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
मुंबई, 2 जून : टीम इंडियाचाच नाही तर जगातील बेस्ट कॅप्टनमध्ये महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) समावेश होतो. आयसीसीच्या सर्व स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा धोनी हा एकमेव कॅप्टन आहे. टीम इंडियाची तर एक संपूर्ण पिढी धोनीच्या मार्गदर्शनाखाली तयार झाली आहे. धोनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाला असला तरी, त्याच्यासोबत चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) टीमकडून खेळण्याचं जगभरातील क्रिकेटपटूंचं स्वप्न असते. भारतीय क्रिकेटचा चेहरा बदलाऱ्या धोनीची टीम इंडियामध्ये निवड सहजासहजी झालेली नाही. त्याला संधी मिळावी म्हणून  10 दिवस प्रयत्न करावे लागले होते. महेंद्रसिंह धोनीला टीम इंडियात सर्वप्रथम संधी देणाऱ्या निवड समितीचे अध्यक्ष किरण मोरे (Kiran More) यांनी धोनीच्या निवडीची 'इनसाईड स्टोरी' सांगितली आहे. धोनीला संधी मिळावी म्हणून तत्कालिन टीम इंडियाचा कॅप्टन सौरव गांगुलीची 10 दिवस मनधरणी करावी, लागली असे मोरेंनी सांगितले. विकेटकिपरची होती गरज टीम इंडियाला 2003 च्या वर्ल्ड कपनंतर आक्रमक बॅटींग करु शकणाऱ्या विकेटकिपरची गरज होती. पार्थिव पटेल, दीपदास गुप्ता आणि दिनेश कार्तिक यांना संधी देण्यात आली. पण, त्यांना याचा पूर्ण फायदा उठवता आला नाही. "आम्ही त्यावेळी 6 व्या किंवा 7 व्या नंबरवर येऊन वेगाने 40-50 रन करु शकणाऱ्या 'पॉवर हिटर'च्या शोधात होतो. राहुल द्रविड वन-डे क्रिकेटमध्ये विकेट कीपिंग करत होता. त्याने विकेट किपर म्हणून 75 मॅच खेळल्या होत्या. त्यामुळे नवा विकेटकिपरचा शोध हा आमचा मुख्य अजेंडा होता." असे मोरे यांनी सांगितले. क्रिकेट विश्वाला दिसला नवा धोनी, विकेट कीपिंग पाहून चाहते दंग, पाहा VIDEO गांगुलीला समजवण्यास 10 दिवस लागले किरण मोरेने पुढे सांगितले की, "निवड समितीच्या एका सदस्याने धोनीचा खेळ पाहिला होता. त्यानंतर मी स्वत:  त्याचा खेळ पाहिला. तो आक्रमक बॅट्समन होता. त्याने प्रतिस्पर्धी टीमच्या सर्वच बॉलर्सची धुलाई केली होती. मी पाहिलेल्या मॅचमध्ये धोनीनं 170 आणि 130 रन काढले होते. दुलीप ट्रॉफीची फायनल मॅच ईस्ट झोन विरुद्ध नॉर्थ झोन यांच्यात होणार होती. ईस्ट झोनकडून दीपदास गुप्ता नियमित विकेट किपर होता. धोनीनं फायनलमध्ये विकेट कीपिंग करावी, अशी आमची इच्छा होती. या विषयावर माझा गांगुली आणि दीपदास गुप्ता यांच्याशी मोठा वाद झाला. त्यानंतर या विषयावर गांगुलीची मनधरणी करण्यासाठी मला 10 दिवस लागले. अखेर, गांगुलीनी फायनलमध्ये धोनीला विकेटकिपर म्हणून संधी दिली. फायनलमध्ये धोनीनं चांगला खेळ केला. त्यानंतर लवकरच त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली." असे मोरे यांनी स्पष्ट केले आहे.
First published:

Tags: Cricket, MS Dhoni, Sourav ganguly

पुढील बातम्या