• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • बॅटनं नाही तर स्टम्पनं करतो चिमुरडा बॅटींग, शॉट्स पाहून बसणार नाही विश्वास! VIDEO

बॅटनं नाही तर स्टम्पनं करतो चिमुरडा बॅटींग, शॉट्स पाहून बसणार नाही विश्वास! VIDEO

साधारण पाच वर्षांचा असलेला हा मुलगा अगदी सराईत बॅट्समनप्रमाणे फटकेबाजी करत आहे. या मुलाकडं क्रिकेटच्या पुस्तकातले सर्व शॉट्स आहेत. ही सर्व फटकेबाजी तो बॅटनं नाही तर एका स्टम्पनं (Stump) करत आहे.

 • Share this:
  मुंबई, 9 मे: क्रिकेट कोचिंगच्या या युगात अगदी लहान वयापासून चांगली बॅटींग करणारे मुलं आता नवल राहिलेलं नाही. सध्या इंटरनेटवर एका चिमुरड्याची बॅटींग व्हारयल (Viral) झाली आहे. साधारण पाच वर्षांचा असलेला हा मुलगा अगदी सराईत बॅट्समनप्रमाणे फटकेबाजी करत आहे. या मुलाकडं क्रिकेटच्या पुस्तकातले सर्व शॉट्स आहेत. तो त्याचा योग्य वापर करतोय. पण ही सर्व फटकेबाजी तो बॅटनं नाही तर एका स्टम्पनं (Stump) करत आहे. सिमेंटच्या पिचवर त्यानं एका स्टम्पनंही बॅटींग कशी करता येते याचं प्रात्याक्षिक दाखवलं आहे. (Kid batting with stump) त्याच्या मागे दोन बाजूला दोन स्टम्प आहेत. तर मिडल स्टम्पचा वापर तो बॅट म्हणून करतोय. ड्राईव्ह, स्कूप, स्वीप, फ्लिक यासारखे फटके तो अगदी सहज एका स्टम्पनं लगावत आहे. सर्व प्रकारच्या बॉलवर त्याच्याकडं उत्तर आहे. 'द ग्रेड क्रिकेटर' या ट्विटर हँडलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. डेव्हिड वॉर्नरचा मालदीवच्या बारमध्ये माजी क्रिकेटपटूसोबत राडा? क्रिकेट फॅन्सनं या व्हिडीओला जोरदार प्रतिसाद दिला असून व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण या मुलाचं हे अजब कौशल्य पाहून आश्चर्यचकित होत आहे.
  Published by:News18 Desk
  First published: