• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • अजब! Run Out होताच बॅट्समननं रागानं फेकली जोडीदारवर बॅट, पाहा VIDEO

अजब! Run Out होताच बॅट्समननं रागानं फेकली जोडीदारवर बॅट, पाहा VIDEO

फिल्डरनं थेट थ्रो करत नॉन स्ट्रायकरवर असलेल्या बॅट्समनला रन आऊट (Run Out) केले. आपण आऊट झालेलं त्याला काही आवडलं नाही. त्यामुळे संतापलेल्या त्या बॅट्समननं जोडीदाराच्या तोंडावर बॅट फेकली.

 • Share this:
  मुंबई, 20 सप्टेंबर : इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन (Kevin Pietersen) सध्या आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी (IPL 2021) यूएईमध्ये आहे.  'स्टार स्पोर्ट्स'च्या कॉमेंट्री पॅनलमध्ये त्याचा समावेश आहे. पीटरसननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इंग्लंडमधील एका क्रिकेट मॅचचा असल्याचं सांगितलं जात आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या या मॅचमध्ये एक बॅट्समन रन आऊट झाला. जोडीदाराशी ताळमेळ नसल्याचा फटका त्याला बसला. स्ट्राईकवर असलेल्या बॅट्समननं बॉल टोलावला आणि एक रनसाठी कॉल केला. त्याच्या कॉलमुळे नॉन स्ट्रायकरचा बॅट्समन पुढे आला. पण तोपर्यंत फिल्डरनं थेट थ्रो करत नॉन स्ट्रायकरवर असलेल्या बॅट्समनला रन आऊट केले. आपण आऊट झालेलं त्याला काही आवडलं नाही. त्यामुळे संतापलेल्या त्या बॅट्समननं जोडीदाराच्या तोंडावर बॅट फेकली.
  नशिबानं त्या बॅट्समनला बॅट लागली नाही. अन्यथा त्याला चांगलीच दुखापत झाली असती. त्याचवेळी रन आऊट झालेल्या बॅ्ट्सननला त्याची चूक कळाली आणि त्यानं तातडीनं जाऊन ऑन स्ट्राईक बॅट्समनची माफी मागितली. पीटरसननं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: