मुंबई, 5 फेब्रुवारी : देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या (Farmer Protest) निमित्तानं टेनिस सुपरस्टार मारिया शारापोव्हा (Maria Sharapova) ही चर्चेत आली आहे. शारापोव्हानं या विषयावर कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. तसंच सोशल मीडियावर काही मतही व्यक्त केलेलं नाही, तरी ती चर्चेत आली आहे. वास्तविक शारापोव्हाच्या एका जुन्या वक्तव्याची आठवण करुन देत नेटिझन्सनी तिला सोशल मीडियावर (Social Media) माफी मागण्यास सुरुवात केली आहे.
काय होते वक्तव्य?
मारियानं 2014 साली झालेल्या विम्बलडन स्पर्धेच्या दरम्यान आपण भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) ओळखत नाही, असं वक्तव्य केलं होतं, मारियाच्या त्या वक्तव्यानंतर भारतामध्ये मोठा गदारोळ उडाला होता. अनेकांनी तिला तेंव्हा ट्रोल देखील केलं होतं.
(हे वाचा-IND vs ENG : कुलदीप यादवला पुन्हा एकदा वगळलं, गौतम गंभीरनं सांगितलं कारण)
आता सध्या केरळमधील (Kerala) काही नेटीझन्सनी मारियाला माफीचे संदेश पाठवण्याची मोहीम सुरु केली आहे. मल्याळण भाषेतील हे संदेश आहेत. ‘सचिन तेंडुलकरला आम्ही ओळखू शकलो नाही. आम्हाला माफ कर. तू बरोबर होतीस.’ अशा आशयाचे ते संदेश आहेत. मारिया शारापोव्हानं देखील या वाढणाऱ्या संदेशांची दखल घेत ‘काही जणांना वर्षाच्या बाबतीत संभ्रम आहे,’ असं ट्वीट केलं आहे. त्यावर देखील अनेकांनी माफी मागणारे ट्वीट केले आहेत.
Anyone else got their years confused?! #😅 pic.twitter.com/ocfC8sanjy
— Maria Sharapova (@MariaSharapova) February 3, 2021
सचिनवर राग का?
शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं अनेक विदेशी सेलिब्रेटींनी ट्विट केल्यानंतर त्याला उत्तर देण्याची मोहीम भारतामध्ये सुरु झाली होती. याच मोहिमेअंतर्गत सचिननं बुधवारी ट्वीट केलं होतं. 'देशाच्या सार्वभौमत्वाशी कधीही तडजोड केली जाणार नाही. बाहेरच्या शक्तींनी याकडे दुरूनच पाहावं, अंतर्गत प्रकरणात हस्तक्षेप करु नये. भारतीयांना आमचा भारत चांगला माहिती आहे आणि आम्ही आमच्या देशाचं भलं जाणतो. चला देश म्हणून एकत्र येऊ या',
India’s sovereignty cannot be compromised. External forces can be spectators but not participants. Indians know India and should decide for India. Let's remain united as a nation.#IndiaTogether #IndiaAgainstPropaganda
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 3, 2021
सचिननं हे ट्वीट करताच भारतीय क्रिकेट विश्वातील अनेक माजी क्रिकेटपटूंनी या विषयावर ट्वीट करत विदेशी मंडळींना सुनावलं आहे. त्याचवेळी सचिनच्या ट्विटमुळे काही जण दुखावले देखील आहेत. याच दुखावलेल्या मंडळीनी शारापोव्हाला संदेश पाठवून माफी मागितली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.