भारताकडून लवकरच खेळेल हा युवा क्रिकेटपटू, अजित आगरकरचं भाकीत

भारताकडून लवकरच खेळेल हा युवा क्रिकेटपटू, अजित आगरकरचं भाकीत

आयपीएल (IPL 2020) चा 13 वा मोसम 10 नोव्हेंबरला संपला. या मोसमात अनेक खेळाडूंनी त्यांची प्रतिभा जगाला दाखवून दिली, पण अजित आगरकर (Ajit Agarkar) याला यातला एक क्रिकेटपटू लवकरच टीम इंडियासाठी खेळेल, असं वाटत आहे.

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) चा 13 वा मोसम 10 नोव्हेंबरला संपला. आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबई (Mumbai Indians) ने दिल्ली (Delhi Capitals) चा पाच विकेटने पराभव करत पाचव्यांदा आयपीएल जिंकली. आयपीएलच्या या मोसमात अनेक युवा खेळाडूंनी त्यांची प्रतिभा दाखवली. देवदत्त पडिक्कल, ईशान किशन, राहुल तेवतिया आणि शुभमन गिल यांनी शानदार बॅटिंग केली. राजस्थानकडून खेळलेला फास्ट बॉलर कार्तिक त्यागी यानेही चमक दाखवली. 20 वर्षांच्या त्यागीने 10 मॅचमध्ये 9 विकेट घेतल्या.

भारताचा माजी क्रिकेटपटू अजित आगरकर (Ajit Agarkar) यानेही कार्तिक त्यागीच्या बॉलिंगचं कौतुक केलं आहे. कार्तिक त्यागी लवकरच टीम इंडियाकडून खेळेल, अशी भविष्यवाणी आगरकरने केली आहे. 'मला कार्तिकचा खेळ बघणं आवडतं. तो खूप युवा आणि अनुभव नसलेला आहे, पण त्याच्यामध्ये काहीतरी खास आहे. त्याच्या ऍडिट्यूडही जबरदस्त आहे. आयपीएलमध्ये खेळून अनुभव मिळवणं कुठल्याही फास्ट बॉलरसाठी सोपं नसतं. तो वेगवेगळ्या टी-20 मॅचमधून अनुभव मिळवेल, अशी अपेक्षा आहे,' असं आगरकर म्हणाला.

अजित आगरकर आयपीएलमध्ये कोलकात्याच्या टीमकडून खेळला होता. कोलकात्याच्या टीमसोबत काही गोष्टी योग्य नाहीत, असं आगरकरला वाटतं. 'काही टीमना बदल करावा लागेल, असं मला वाटतं. सीएसकेलाही बदल करण्याची गरज आहे. पण कोलकात्याच्या टीममध्ये सातत्य आहे. त्यांच्याकडे मॅच जिंकवून देणारे खेळाडू आहेत. ते आणखी चांगली कामगिरी करू शकतात. या मोसमातही त्यांची टीम चांगल्या स्थितीमध्ये होती, पण त्यांनी मध्येच कर्णधार बदलला, याचा टीमच्या मनोबलावर परिणाम झाला,' असं आगरकरने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं.

Published by: Shreyas
First published: November 18, 2020, 4:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading