अष्टपैलू कामगिरी! 56 चेंडूत 134 धावा, त्यानंतर घेतल्या 8 विकेट

अष्टपैलू कामगिरी! 56 चेंडूत 134 धावा, त्यानंतर घेतल्या 8 विकेट

क्रिकेटमध्ये अनेकदा अष्टपैलू खेळाडू सामना एकहाती जिंकून देतात. आताही एका भारतीय खेळाडूची जोरदार चर्चा होत आहे.

  • Share this:

बेंगळुरु, 24 ऑगस्ट : क्रिकेटमध्ये सध्या भारत आणि विंडीज यांच्यातील कसोटी मालिका आणि ऑस्ट्रेलिया - इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या अॅशेस मालिकेची चर्चा आहे. मात्र, याशिवाय भारतात कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये झालेल्या एका सामन्यानं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये कर्नाटकचा अष्टपैलू खेळाडू कृष्णप्पा गौतम यानं फलंदाजी करताना तुफान फटकेबाजी तर केलीच पण गोलंदाजी करताना प्रतिस्पर्धी संघातील 8 गडी बाद केले.

कर्नाटकात सुरु असलेल्या कर्नाटक प्रिमियर लीगमध्ये बेल्लारी टस्कर्सकडून खेळणाऱ्या गौतमने 56 चेंडूत 7 चौकार आणि 13 षटकारांसह नाबाद 134 धावांची खेळी केली. त्यानंतर गोलंदाजी करताना त्यानं फक्त 15 धावा देत 8 गडी बाद केले. टी 20 च्या इतिहासात गोलंदाजीतील सर्वोत्तम कामगिरीपैकी  एक ठरली आहे.

गौतमच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बेल्लारीने 17 षटकांत 3 बाद 203 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळणाऱ्या शिवमोगाला 133 धावांपर्यंत मजल मारता आली. गौतमनं शिवमोगाच्या 8 फलंदाजांना बाद करून बेल्लारीला 70 विजय मिळवून दिला.

कर्नाटक प्रिमियर लीगच्या इतिहासात गौतमनं सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. याशिवाय गोलंदाजीतही सर्वोत्तम कामगिरी केली. गौतमनं फक्त 39 चेंडूत शतक साजरं केलं. त्यानं नाबाद 134 धावांची खेळी केली. पहिल्यांदा गोलंदाजांचा समाचार घेतल्यानंतर गौतमनं फलंदाजांनाही त्रास दिला.

भाजप प्रवेशाबाबत उदयनराजे भोसले काय म्हणाले? पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2019 10:40 AM IST

ताज्या बातम्या