कपिल देव म्हणाले, शास्त्रींच्या निवडीत विराटचं मत घेतलं असतं तर...

कपिल देव म्हणाले, शास्त्रींच्या निवडीत विराटचं मत घेतलं असतं तर...

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा शास्त्रींची निवड झाली आहे. विंड़ीज दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराटने शास्त्री प्रशिक्षक झाल्यास आनंद होईल असं म्हटलं होतं

  • Share this:

मुंबई, 17 ऑगस्ट : वेस्ट इंडीज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी पुन्हा रवी शास्त्री यांनाच संधी देण्यात आली आहे. कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची निवड केली. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत कपिल देव यांनी निवड जाहीर केली.

मुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीत रवी शास्त्री यांनी माईक हेसन आणि टॉम मूडी यांना मागे टाकून बाजी मारली. कपिल देव म्हणाले की, माईक हेसन आणि रवी शास्त्री यांच्यात जोरदार चुरस होती. अत्यंत कमी फरकानं रवी शास्त्रींच्या गळ्यात प्रशिक्षकपदाची माळ पडली. विंडीज दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराट कोहलीनेसुद्धा शास्त्री प्रशिक्षक झाल्यास आवडेल असं म्हटलं होतं.

प्रशिक्षक निवडण्यासाठी तीन सदस्यांची सल्लागार समिती असताना विराट कोहलीचे मत किंवा सल्ला विचारात घेतला का असा प्रश्न कपिल देव यांना विचारण्यात आला. यावर कपिल देव यांनी सांगितलं की, विराटकडून कोणताही सल्ला किंवा मत घेतलं नाही. जर त्याचं मत घेतलं असतं तर आम्ही संपूर्ण संघाचं मत जाणून घेतलं असतं.

शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतानं 21 कसोटी सामने खेळले त्यातील 13 सामन्यात विजय मिळवला. तर, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 36 सामन्यांपैकी 25 सामन्यात विजय मिळवला. मात्र रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली आशियाई चषक वगळता भारताला एकही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही. वर्ल्ड कपमध्येही सेमीफायनलमध्ये भारताचा मानहानीकारक पराभव झाला.

SPECIAL REPORT: आता सरकारी योजनेतून मिळणार फक्त एक घर?

Published by: Suraj Yadav
First published: August 17, 2019, 10:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading