कपिल देव यांच्याकडून सगळ्या अफवांना पूर्णविराम, VIDEO शेयर करुन म्हणाले...

कपिल देव यांच्याकडून सगळ्या अफवांना पूर्णविराम, VIDEO शेयर करुन म्हणाले...

भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी त्यांचा एक व्हिडिओ शेयर करुन त्यांच्याबाबत पसरत असलेल्या अफवांना पूर्णविराम दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर : भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी त्यांचा एक व्हिडिओ शेयर करुन त्यांच्याबाबत पसरत असलेल्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. एका खासगी बँकेच्या कार्यक्रमात झालेल्या त्यांच्या मुलाखतीचा प्रोमो सोशल मीडियावर टाकून त्यांनी, अफवा पसरवणाऱ्यांचं तोंड बंद केलं आहे. त्यामुळे कपिल देव यांच्या मृत्यूच्या अफवा होत्या हे देखील स्पष् झालं आहे. कपिल देव यांनी 21 सेकंदांचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर अपलोड केला. या व्हिडिओत ते सुदृढ आणि स्वस्थ दिसून येत आहेत.

23 ऑक्टोबरला छातीत दुखायला लागल्यामुळे त्यांना दिल्लीच्या फोर्टिस-एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. याच हॉस्पिटलमध्ये त्यांची एन्जिओप्लास्टीही करण्यात आली. त्यानंतर 25 ऑक्टोबरला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

सोमवारी सोशल मीडियावर कपिल देव यांच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या. यामध्ये 61 वर्षीय कपिल देव यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होते आणि तिथे त्यांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. यानंतर संध्याकाळी त्यांनी जांभळ्या रंगाचा कोट आणि पॅन्ट घालत हा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी नमस्कार, मी कपिल देव. मी 11 नोव्हेंबर रोजी माझ्या क्रिकेटमधल्या काही आठवणी बार्कलेज कुटुंबासह शेयर करणार आहे. उत्सवाचा हंगाम सुरू झाला असून 11 तारखेला आपल्या प्रश्नांसह सज्जव्हा. तुमच्याकडील वेळेचा आनंद घ्या आणि मजा करा, असं त्यांनी या व्हिडिओत म्हटलंय.

कपिल देव यांच्याविषयी चुकीच्या अफवा पसरवल्यामुळे त्यांच्याजवळच्या व्यक्ती नाराज झाल्या असल्याची माहिती त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

23 तारखेच्या रात्री छातीमध्ये दुखत असल्याने कपिल देव नवी दिल्लीतील फोर्टिस-एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूट हॉस्पिटलमध्ये भरती झाले होते.त्यानंतर त्याच रात्री त्यांच्यावर डॉक्टर अतुल माथूर आणि त्यांच्या टीमने एन्जिओप्लास्टी केली होती. यामध्ये रक्तप्रवाह पूर्वीसारखा वाहण्यासाठी रक्तवाहिन्यांमधील अडथळा दूर केला जातो.

कपिल देव यांच्यानावावर सर्वांत जास्त टेस्ट विकेट घेण्याचा विक्रम होता. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक 434 विकेट घेणारे ते पहिले बॉलर होते. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या कोर्टनी वॉल्श यांनी त्यांचा हा रेकॉर्ड सहा वर्षानंतर मोडला. कपिल देव यांनी 1994 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. कपिल यांनी 1983 मध्ये पहिल्यांदा भारतीय टीमला वर्ल्ड कप जिंकवून दिला, त्या टीमचे कर्णधार कपिल देव होते.

कपिल देव यांनी 1978 ते 1994 या 16 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत 131 टेस्टमध्ये 434 विकेट आणि 5,248 रन केल्या आहेत. तर 225 वनडे सामन्यात 253 विकेट आणि 3,783 रन केल्या आहेत. 1983 मध्ये वनडे वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवण्याबरोबरच 1985 मध्ये शारजाहमध्ये चार देशांच्या रोथमन्स चषकात भारतीय क्रिकेट टीमचं नेतृत्व केलं होते.

कपिल देव यांना 1979-80 मध्ये अर्जुन पुरस्कार, 1982 मध्ये पद्मश्री आणि 1991 मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. 2010 मध्ये कपिल देव यांचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. तसंच बीसीसीआयनेदेखील त्यांना सी के नायडू हा बीसीसीआयचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.

Published by: Shreyas
First published: November 4, 2020, 7:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या