Home /News /sport /

'हा खेळाडूंचा अपमान', टीम मॅनेजमेंटच्या 'त्या' विचारावर कपिल देव नाराज

'हा खेळाडूंचा अपमान', टीम मॅनेजमेंटच्या 'त्या' विचारावर कपिल देव नाराज

शुभमन गिल (Shubman Gill) जखमी झाल्यानं त्याच्या जागेवर पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) इंग्लंडमध्ये बोलावण्यासाठी टीम मॅनेजमेंट आग्रही आहे, असं वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

    मुंबई, 4 जुलै: भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पहिली टेस्ट 4 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या टेस्टपूर्वीच टीम इंडियाला धक्का बसला आहे. भारतीय टीमचा ओपनिंग बॅट्समन शुभमन गिल (Shubman Gill) जखमी झाला आहे. गिल जखमी झाल्यानं त्याच्या जागेवर पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) इंग्लंडमध्ये बोलावण्यासाठी टीम मॅनेजमेंट आग्रही आहे, असं वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. या वृत्तावर टीम इंडियाचे माजी कॅप्टन आणि महान ऑल राऊंडर कपिल देव (Kapil Dev) नाराज झाले आहेत. मयंक अग्रवाल (Mayank Agarwal), केएल राहुल (KL Rahul) हे दोन खेळाडू टीममध्ये आहेत. त्याचबरोबर स्टॅण्डबाय खेळाडू असलेला अभिमन्यू इश्वरन (Abhimanyu Iswaran) आहे. या तीन खेळाडूंना बाहेर ठेवून जर पृथ्वी शॉचा टीममध्ये समावेश योग्य नाही, असं मत कपिल देव यांनी व्यक्त केलं आहे. पृथ्वी शॉचा टीममध्ये समावेश केल्यास त्याचा टीम मॅनेजमेंटच्या  प्रतिमेवर परिणाम होईल, त्याचबरोबर सध्या जे खेळाडू इंग्लंडमध्ये आहेत त्यांना हे अपमानास्पद वाटेल, असं मत कपिल यांनी व्यक्त केलं आहे. कपिल देव यांनी एबीपी न्यूजवरील कार्यक्रमात सांगितले की, "माझ्या मते याची काहीही गरज नाही. निवड समितीचा सन्मान केला पाहिजे. त्यांनी टीमची निवड केली आहे. ही टीम कोहली आणि शास्त्रीशी चर्चा केल्याशिवाय निवडली असेल असं मला वाटत नाही. टीममध्ये केएल राहुल आणि मयंक अग्रवाल हे दोन अनुभवी ओपनिंग बॅट्समन आहेत. त्या परिस्थितीमध्ये तिसरा पर्याय शोधण्याची गरज काय? जी टीम निवडली आहे त्याच टीममध्ये ओपनिंग बॅट्समन आहेत, त्यांनाच संधी मिळायला हवी, अन्यथा टीममध्ये असलेल्या खेळाडूंचा तो अपमान असेल,'' असे कपिल यांनी स्पष्ट केले. IPL 2021 पूर्वी मुंबई इंडियन्ससाठी Good News, रोहितचा खास सहकारी फॉर्मात निवड समितीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही कपिल देव यावेळी पुढे म्हणाले की, "कॅप्टन आणि टीम मॅनेजमेंटनं टीम निवडीच्या बैठकीत त्यांचे मत मांडावे. पण, निवड समितीच्या सदस्यांच्या मताकडे दुर्लक्ष करत एखाद्या खेळाडूची मागणी करु नये. मला हे ऐकून आश्चर्य वाटलं. हे असं झालं असेल तर तो निवड समितीच्या सदस्यांना कमी लेखण्याचा प्रकार आहे.  हा जर प्रकार घडला असेल तर आपल्याला निवड समितीच्या सदस्यांची गरज राहणार नाही. या विषयावर विराट आणि शास्त्रीच सत्य सांगू शकतात."
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: India vs england, Prithvi Shaw

    पुढील बातम्या