• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final जिंकल्यानंतर विराटच्या खांद्यावर डोकं का ठेवलं? विल्यमसनचं भावुक उत्तर

WTC Final जिंकल्यानंतर विराटच्या खांद्यावर डोकं का ठेवलं? विल्यमसनचं भावुक उत्तर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final) संपल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि केन विल्यमसन (Kane Williamson) यांच्या गळाभेटीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाला होता. विल्यमसननं त्या कृतीचं कारण सांगितलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 1 जुलै : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (WTC Final) संपल्यानंतर  विराट कोहली (Virat Kohli) आणि केन विल्यमसन (Kane Williamson) यांच्या गळाभेटीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाला होता. हा फोटो फॅन्समध्ये चांगलाच लोकप्रिय झाला. या कृतीबद्दल क्रिकेट फॅन्सनी या दोन्ही कॅप्टनशी प्रशंसा केली आहे. 'स्पिरीट ऑफ गेम' असं या फोटोचं वर्णन करण्यात आले आहे. ही सामान्य गळाभेट नव्हती. तर  विल्यमसननं विजयी खेळी केल्यानंतर विराट कोहलीच्या खांद्यावर डोकं टेकवलं होतं. केन विल्यमसननं स्वत: या फोटोच्या वेळी असलेली परिस्थिती सांगितली आहे. "तो एक मोठा क्षण होता. भारताविरुद्धची मॅच कुठेही असली तरी आव्हानात्मक असते. त्यांनी अनेकदा आमच्यासाठी एक बेंचमार्क सेट केला आहे. त्यांच्या टीममध्ये मोठी खोली आहे. विराट आणि माझी अनेक वर्षांपासून मैत्री आहे. आमची मैत्री आणि नातं हे क्रिकेट खेळापेक्षा देखील अधिक गाढ आहे. हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे विराटच्या खांद्यावर डोकं ठेवण्याची ती घटना खूप खास होती," असं भावुक उत्तर त्यानं दिलं. विल्यमसननं पुढं सांगितलं की, "दोन्ही टीमनं चांगलं क्रिकेट खेळलं. मॅच खूप रोमहर्षक झाली. संपूर्ण मॅचमध्ये आम्ही एका धारधार चाकूवरुन चालत आहोत असे वाटत होते. अखेर इतक्या अवघड मॅचनंतर दोन्ही टीमची प्रशंसा केली पाहिजे. ट्रॉफी ही एकाच टीमला मिळते. कदाचित दुसऱ्या टीमच्या ते नशिबात नसते.'' मायकल वॉनचा महिला टीमच्या खांद्यावरुन विराट कोहलीवर निशाणा, म्हणाला... न्यूझीलंडनं फायनल मॅचमध्ये टीम इंडियाचा 8 विकेटने पराभव केला. विल्यमसननं पहिल्या इनिंगमध्ये 49 तर दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 52 रन काढले.
  Published by:News18 Desk
  First published: