ICC Test Ranking: स्मिथ आणि विराटला मागं टाकत ‘हा’ खेळाडू बनला नंबर 1!

ICC Test Ranking: स्मिथ आणि विराटला मागं टाकत ‘हा’ खेळाडू बनला नंबर 1!

ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या तीन देशांमध्ये झालेल्या ‘बॉक्सिंग डे’ (Boxing Day) टेस्टनंतर ICC नं टेस्ट रँकिंग (ICC Test Ranking) जाहीर केले आहे. या यादीमध्ये मोठे बदल झाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 31 डिसेंबर :  ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या तीन देशांमध्ये झालेल्या ‘बॉक्सिंग डे’ (Boxing Day) टेस्टनंतर ICC नं टेस्ट रँकिंग (ICC Test Ranking) जाहीर केले आहे. या यादीमध्ये मोठे बदल झाले असून ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन स्टीव्ह स्मिथला (Steve Smith)  खराब कामगिरीचा फटका बसला आहे.

कोण आहे नंबर 1?

आयसीसी रँकिंगमध्ये स्टीव्ह स्मिथ यापूर्वी नंबर 1 होता. मेलबर्न टेस्टमध्ये त्याला एकूण 8 रन्सच करता आले. यामुळे स्मिथची पहिल्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. विराट कोहली (Virat Kohli) मायदेशी परतल्यानं मेलबर्न टेस्ट खेळू शकला नाही. त्यानंतरही तो दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. पाकिस्तानविरुद्धच्या बॉक्सिंग टेस्टमध्ये सेंच्युरी करणाऱ्या केन विल्यमसननं (Kane Williamson) विराटला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर धडक मारली आहे. विल्यमसन पाच वर्षानंतर नंबर 1 वर पोहचला आहे.

टॉप टेन बॅट्समन्सच्या यादीमध्ये मार्नस लाबुशेन पाचव्या, अजिंक्य रहाणे सहाव्या, डेव्हिड वॉर्नर सातव्या, बेन स्टोक्स आठव्या, जो रुट नवव्या तर चेतेश्वर पुजारा दहाव्या क्रमांकावर आहे.

अश्विन-रहाणेला मोठा फायदा

विराटच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) टीम इंडियाचं नेतृत्व केलं. रहाणेनं मेलबर्न टेस्टमध्ये एकूण 139 रन्स काढले. त्यामुळे तो आता सहाव्या क्रमांकावर पोहचला आहे. रहाणे ऑक्टोबर 2019 मध्ये त्याच्या टेस्ट करियमधील सर्वोत्तम पाचव्या क्रमांकावर होता. आता आगामी दोन टेस्टमध्ये रहाणेला हा बेस्ट मोडण्याची संधी आहे.

भारताचा ऑफ स्पिनर आर. अश्विन (R. Ashwin) टॉप टेन बॉलरमधील एकमेव स्पिनर आहे. अश्विनलाला मेलबर्न टेस्टच्या कामगिरीचा फायदा झाला असून तो आता सातव्या क्रमांकावर आहे. अश्विनशिवाय जसप्रीत बुमराह (9 वा क्रमांक) आणि रवींद्र जडेजा (14 वा क्रमांक) या भारतीय बॉलर्सचं रँकिंगही सुधारले आहे.

Published by: News18 Desk
First published: December 31, 2020, 1:10 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या