केन विल्यम्सनने चाहत्यांसोबत बाउंड्रीवर असा साजरा केला वाढदिवस, पाहा VIDEO

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनचा गुरुवारी वाढदिवस होता. दरम्यान, सराव सामन्यावेळी प्रेक्षकांनी आणलेला केक कापून त्यानं वाढदिवस साजरा केला.

News18 Lokmat | Updated On: Aug 9, 2019 12:33 PM IST

केन विल्यम्सनने चाहत्यांसोबत बाउंड्रीवर असा साजरा केला वाढदिवस, पाहा VIDEO

कोलंबो, 09 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये पराभवानंतर न्यूझीलंडचा संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. वर्ल्ड कपनंतर जगभरातील चाहत्यांची मनं न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सननं जिंकली. त्याच्या साधेपणाचं कौतुक सर्वच स्तरातून झालं. गुरुवारी केन विल्यम्सनचा वाढदिवस होता. दरम्यान, न्यूझीलंड सराव सामना खेळत असताना विल्यम्सनचा वाढदिवस त्याच्या लंकेतील चाहत्यांनी साजरा केला.

न्यूझीलंडचा सराव सामना सुरू असताना लंकेतील चाहते सीमारेषेवर केक घेऊन पोहचले होते. सामन्यातील ब्रेकवेळी विल्यम्सनला चाहते केक घेऊन थांबल्याचं दिसलं. त्याने धावत जाऊन केक कापला आणि चाहत्यांनाही भरवला. त्यावेळी सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा स्वीकारून शांतपणे केन विल्यम्सन मैदानात परतला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात 14 ऑगस्टपासून 2 कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. लंकेच्या संघात दिग्गज खेळाडूंचे पुनरागमन झालं आहे. तर न्यूझीलंडच्या प्रशिक्षकांनी लंकेविरुद्धच्या मालिकेसाठी चार फिरकीपटूंना संघात स्थान दिलं आहे. दोन्ही संघांच्या कसोटी वर्ल्ड चॅम्पियनशिपला सुरुवात या मालिकेपासून होणार आहे.

विंडीज दौऱ्यातून डावललं, विक्रमी द्विशतक करून गंभीरला टाकलं मागे

Loading...

पावसाच्या खेळानंतर मैदानावर विराट-गेल यांचा डान्स, पाहा VIDEO

VIDEO: 'शाळेत गरोदर महिला आहे पण साधं औषध नाही', सांगलीत पुरग्रस्त संतापले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 9, 2019 12:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...