IND vs AUS : कोरोनाची भीती, भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजमधून या खेळाडूची माघार

IND vs AUS : कोरोनाची भीती, भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजमधून या खेळाडूची माघार

भारतीय क्रिकेट टीम (Team India) च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय टीम तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. कोरोना व्हायरस (Corona Virus) नंतर टीम इंडियाची ही पहिलीच सीरिज (India vs Australia) असणार आहे.

  • Share this:

सिडनी, 18 नोव्हेंबर : भारतीय क्रिकेट टीम (Team India) च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय टीम तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. कोरोना व्हायरस (Corona Virus) नंतर टीम इंडियाची ही पहिलीच सीरिज (India vs Australia) असणार आहे. पण कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर केन रिचर्डसन (Kane Richardson) याने वनडे आणि टी-20 सीरिजमधून माघार घेतली आहे. कोरोनाच्या संकटात कुटुंबासोबत राहण्यासाठी केन रिचर्डसनने हा निर्णय घेतला आहे. केन रिचर्डसनच्याऐवजी एंड्रयू टाय याची वनडे आणि टी-20 सीरिजसाठी निवड झाली आहे.

केन रिचर्डसनने मंगळवारी निवड समितीला आपल्याला पत्नी आणि बाळासोबत राहायचं आहे, असं सांगितल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितलं. केन रिचर्डसनसाठी हा निर्णय कठीण होता, पण निवड समिती आणि टीमने केनच्या या निर्णयाचं पूर्णपणे समर्थन केलं, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे निवड समिती सदस्य ट्रेवर होन्स म्हणाले.

'केनला ऍडलडेमध्ये पत्नी नाइकी आणि आपल्या नवजात बाळासोबत राहायचं आहे. आम्ही त्याच्या निर्णयाचं समर्थन करतो. टीमला केनची कमी जाणवेल, पण आम्ही त्याचा निर्णय पूर्णपणे समजतो,' असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितलं.

या आठवड्यात ऍडलेडमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले, त्यामुळे काही राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या, याच कारणामुळे केन रिचर्डसनने सीरिजमधून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. राज्यांच्या सीमा बंद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचा कर्णधार टीम पेन आणि मार्नस लाबुशेन यांच्यासह काही खेळाडूंना सिडनीमध्ये एयरलिफ्ट करण्यात आलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या टेस्ट सीरिजला 17 डिसेंबरपासून ऍडलेडमधूनच सुरुवात होणार आहे. सीरिजची पहिली टेस्ट डे-नाईट असणार आहे. ऍडलेडमध्ये टेस्ट मॅचचं आयोजन करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत, आणि तिथल्या परिस्थितीचं निरीक्षण करत आहोत, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सांगण्यात येत आहे.

Published by: Shreyas
First published: November 18, 2020, 8:16 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading