मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

PSL 7: डिमोशन होताच पाकिस्तानचा क्रिकेटपटू संतापला, टोकाचा निर्णय जाहीर

PSL 7: डिमोशन होताच पाकिस्तानचा क्रिकेटपटू संतापला, टोकाचा निर्णय जाहीर

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेच्या सातव्या सिझनचा (PSL 7) ड्राफ्ट जाहीर झाला आहे. हा ड्राफ्ट जाहीर होताच नाराजीचे प्रकार सुरू झाले आहेत.

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेच्या सातव्या सिझनचा (PSL 7) ड्राफ्ट जाहीर झाला आहे. हा ड्राफ्ट जाहीर होताच नाराजीचे प्रकार सुरू झाले आहेत.

पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेच्या सातव्या सिझनचा (PSL 7) ड्राफ्ट जाहीर झाला आहे. हा ड्राफ्ट जाहीर होताच नाराजीचे प्रकार सुरू झाले आहेत.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 13 डिसेंबर : पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेच्या सातव्या सिझनचा (PSL 7) ड्राफ्ट जाहीर झाला आहे. हा ड्राफ्ट जाहीर होताच नाराजीचे प्रकार सुरू झाले आहेत. या स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या स्टार खेळाडूंच्या श्रेणीमध्ये बदल झाल्यानं त्यांचा दिग्गज क्रिकेटपटू नाराज झाला असून त्याने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

पाकिस्तानचा विकेट किपर-बॅटर कमरान अकमलचे (Kamran Akmal) या ड्राफ्टमध्ये गोल्डन श्रेणीतून सिल्व्हर श्रेणीत डिमोशन झाले आहे. पेशावर जाल्मी (Peshawar Zalmi) टीमने त्याची निवड केली होती. पीएसएलच्या इतिहासात सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कमरानचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. तरीही त्याला डिमोशन देण्यात आल्यानं तो नाराज झाला असून त्याने स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

कमरान अकमलनं 2017 साली शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळली होती. पीसीबीने त्याला यापूर्वीच प्लॅटेनियम श्रेणीतून काढून गोल्ड श्रेणीत ढकलले होते. त्यानंतर पेशावरच्या टीमने त्याला आणखी खाली ढकलले. सिल्व्हर श्रेणीत निवड होताच कमरानने पेशारने आपल्याला मुक्त करावे अशी विनंती केली असून त्याचबरोबर या सिझनमध्ये न खेळण्याचा निर्णय जाहीर केला. कमराननं तसं ट्विटही केले आहे.

'मला कृपया रिलीज करा. मी या श्रेणीमध्ये खेळण्यासाठी योग्य नाही. खालची श्रेणी तरूण खेळाडूंसाठी योग्य आहे. मला पेशावरच्या टीमकडून कोणतीही सहानुभूती नको आहे. मी त्यांच्याकडून यापूर्वीचे सहा सिझन खेळलो आहे.' असे कमरानने स्पष्ट केले.

IND vs SA: ऋतुराजबाबत फार उशीर करू नका, दिग्गज क्रिकेटपटूचा निवड समितीला सल्ला

या श्रेणीची घोषणा झाली तेव्हाच मी त्याबाबत समाधानी नव्हतो. माझा रेकॉर्ड चांगला असूनही माझे डिमोशन करण्यात आले. मला पेशावरच्या टीमकडून खेळायला आवडते. त्यांच्या टीमचे खेळाडू तसेच मॅनेजमेंट चांगले असल्याचं कमराननं म्हंटले आहे. कमरानचा भाऊ उमर अकमल (Umar Akmal) याने पीएसएलमध्ये पुनरागमन केले आहे. त्याची क्वेटाच्या टीमने सिल्व्हर कॅटेगिरीमध्ये निवड केली आहे.

First published:

Tags: Cricket news, Pakistan Cricket Board