मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'भारत-पाकिस्तान क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी गांगुली निर्णायक ठरणार'

'भारत-पाकिस्तान क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी गांगुली निर्णायक ठरणार'

भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 2013-14 साली शेवटची द्विपक्षीय सीरिज खेळली गेली होती. त्यानंतर दोन्ही टीम फक्त आयसीसीच्या स्पर्धेमध्येच एकमेकांच्या विरुद्ध खेळतात.

भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 2013-14 साली शेवटची द्विपक्षीय सीरिज खेळली गेली होती. त्यानंतर दोन्ही टीम फक्त आयसीसीच्या स्पर्धेमध्येच एकमेकांच्या विरुद्ध खेळतात.

भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 2013-14 साली शेवटची द्विपक्षीय सीरिज खेळली गेली होती. त्यानंतर दोन्ही टीम फक्त आयसीसीच्या स्पर्धेमध्येच एकमेकांच्या विरुद्ध खेळतात.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 3 जुलै : भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 2013-14 साली शेवटची द्विपक्षीय सीरिज खेळली गेली होती. त्यानंतर दोन्ही टीम फक्त आयसीसीच्या स्पर्धेमध्येच एकमेकांच्या विरुद्ध खेळतात. क्रिकेट विश्वातील सर्वात हाय व्होल्टेज सीरिज पुन्हा सुरु व्हावी अशी अनेक फॅन्सची इच्छा आहे. फॅन्सची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची भूमिका निर्णायक ठरु शकते, असं मत पाकिस्तानच्या क्रिकेटपटूनं व्यक्त केलं आहे.

पाकिस्तानचा विकेट किपर-बॅट्समन कमरान अकमलनं (Kamran Akmal) एका यूट्यूब चॅनलसोबत बोलताना हा दावा केला आहे. " गांगुली पाकिस्तान विरुद्ध बराच क्रिकेट खेळला आहे.  या दोन देशांना क्रिकेटच एकमेकांच्या जवळ आणू शकते, हे त्याला माहिती आहे. त्याच्या कार्यकाळात भारत-पाकिस्तान क्रिकेट पुन्हा सुरु व्हावं अशी त्याची इच्छा असेल, '' असा दावा अकमलनं केला आहे.

ICC ची भूमिका निर्णायक

भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सुरु करण्यासाठी आयसीसीची (ICC) भूमिका महत्त्वाची ठरु शकते, असं मत अकमलनं व्यर्त केलं आहे. विशेषत: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) स्पर्धेत दोन्ही टीमनं परस्परांच्या देशात किंवा त्रयस्थ ठिकाणी मालिका खेळली पाहिजे यासाठी आयसीसीनं पुढाकार घ्यावा' अशी मागणी अकमलनं केली.

PCB चं काय चाललंय?

कमरान अकमल भारत-पाकिस्तान क्रिकेटची मागणी करत असतानाच त्याच्या क्रिकेट बोर्डानं बीसीसीआयच्या विरुद्ध मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सहा आयसीसी (ICC Events) स्पर्धांचं आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामध्ये  2025 आणि 2029 साली चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवण्यासाठी पाकिस्तान आग्रही आहे. याचसोबत त्यांनी 2026 आणि 2028 टी-20 वर्ल्ड कप आणि 2027 तसंच 2031 चा 50 ओव्हरच्या वर्ल्ड कप आयोजनाचीही ऑफर दिली आहे.

इंग्लंडच्या कोचनं केली IPL ची प्रशंसा, टीमला नवा सुपरस्टार मिळाल्याची कबुली

या सहा स्पर्धा खेळवण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड श्रीलंका (Sri Lanka), बांगलादेश (Bangladesh) आणि युएईसोबत (UAE) हातमिळवणी करण्यासाठी तयार आहे. सोबतच पाकिस्तानमध्ये कराची, लाहोर, मुलतान आणि रावळपिंडी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची स्टेडियम आहेत आणि पेशावरमध्येही लवकरच स्टेडियम बांधून पूर्ण होईल, असा दावा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला आहे. बीसीसीआयनं देखील  यापैकी काही स्पर्धांच्या आयोजनासाठी प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.

First published:

Tags: Cricket news, Pakistan Cricket Board, Sourav ganguly