Home /News /sport /

ऋषभ पंतच्या आधी 'या' विकेट किपरचा इंग्लंडमध्ये धमाका! 17 बॉलमध्ये काढले 88 रन

ऋषभ पंतच्या आधी 'या' विकेट किपरचा इंग्लंडमध्ये धमाका! 17 बॉलमध्ये काढले 88 रन

या विकेटकिपरनं फक्त 51 बॉलमध्ये 112 रनची खेळी केली. यामध्ये त्याने 10 सिक्स आणि 7 फोरची बरसात केली. म्हणजे त्यानं फक्त 17 बॉलमध्येच 88 रन काढले.

    लंडन, 17 जून : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलला (WTC Final 2021) शुक्रवारी सुरुवात होत आहे. या सिझनमध्ये फॉर्मात असलेला ऋषभ पंत (Rishabh Pant) फायनलमध्ये 'एक्स फॅक्टर' असेल, असं मत अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. पंतला न्यूझीलंडविरुद्ध बॅटींगची संधी मिळण्यापूर्वी इंग्लंडमध्ये एका विकेटकिपरनं आक्रमक शतक झळकावले आहे. या विकेटकिपरनं फक्त 51 बॉलमध्ये 112 रनची खेळी केली. यामध्ये त्याने 10 सिक्स आणि 7 फोरची बरसात केली. म्हणजे त्यानं फक्त 17 बॉलमध्येच 88 रन काढले. प्रतिस्पर्धी टीमच्या बॉलर्सची प्रचंड धुलाई करणाऱ्या या विकेटकिपर बॅट्समनचं नाव आहे जॉने बेअरस्टो (Jonny Bairstow). इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या T20 ब्लास्टमध्ये यॉर्कशर (Yorkshire) कडून खेळताना वर्सेस्टशायर (Worcestershire) विरुद्ध त्याने ही आक्रमक इनिंग खेळली. बेअरस्टोच्या आक्रमक सेंच्युरीमुळे यॉर्कशायरनं पहिल्यांदा बॅटींग करताना 20 ओव्हर्समध्ये 6 आऊट 216 रन काढले. इंग्लंड आणि सनरायझर्स हैदराबादचा (SRH) हा खेळाडू या स्पर्धेत चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. त्याने या स्पर्धेत 34, 67, 82 आणि 112 रन काढले आहेत. वर्सेस्टशायरला हे आव्हान पेलवलं नाही. त्यांची संपूर्ण टीम फक्त 122 रनवर ऑल आऊट झाली. वर्सेस्टशायकडून  कॅप्टन मोईन अलीनं (Moeen Ai) सर्वात जास्त 39 रन काढले. आता एकाचवेळी खेळणार 2 टीम इंडिया, BCCI चा मोठा निर्णय इंग्लंडसाठी काळजीसाठी बातमी T20 ब्लास्टटच्या या मॅचमध्ये बेअरस्टोनं आक्रमक शतक झळकावले. पण, या खेळीच्या दरम्यान त्याचा गुडघा दुखावला. त्यामुळे त्याने पाच ओव्हर रनर घेऊन बॅटींग केली. तसेच तो विकेट किपिंग करण्यासाठीही उतरला नाही. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध 3 टी20 सामन्यांच्या मालिकेपूर्वी इंग्लंडसाठी ही काळजीची बातमी आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, England

    पुढील बातम्या