38 व्या वर्षी क्रिकेटपटूची निवृत्तीतून माघार, ऑस्ट्रेलियात खेळणार

38 व्या वर्षी क्रिकेटपटूची निवृत्तीतून माघार, ऑस्ट्रेलियात खेळणार

क्रिकेटच्या मैदानात वयापेक्षा तुमची इच्छाशक्ती आणि जोश बहुतेकवेळा महत्त्वाचे ठरतात. दक्षिण आफ्रिकेचा माजी ऑलराऊंडर जॉन बोथा (Johan Botha) याच्यासाठी हे उदाहरण चपखल आहे.

  • Share this:

मुंबई, 7 डिसेंबर : क्रिकेटच्या मैदानात वयापेक्षा तुमची इच्छाशक्ती आणि जोश बहुतेकवेळा महत्त्वाचे ठरतात. दक्षिण आफ्रिकेचा माजी ऑलराऊंडर जॉन बोथा (Johan Botha) याच्यासाठी हे उदाहरण चपखल आहे. बोथाने 38 व्या वर्षी निवृत्तीतून माघर घेत पुन्हा क्रिकेटच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. बोथा यावर्षी ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग (BBL) खेळणार आहे. होबार्ट हरिकेन्स टीमने बोथासोबत करार केला आहे. जॉन बोथा हा सध्या ऑस्ट्रेलियाच्या टान्समानियामध्ये प्रशिक्षक आहे.

बोथाला कशी मिळाली संधी?

होबार्ट हरिकेन्सचा स्टार स्पिनर संदीप लामिचानेला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली, त्यामुळे तो यावर्षी बिग बॅश लीगमध्ये खेळताना दिसणार नाही, म्हणून होबार्टने बोथाला टीममध्ये घेतलं. जॉन बोथाला 2016 साली ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व मिळालं. त्याआधी बोथा बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सकडून खेळला. तसंच आयपीएलमध्ये बोथा राजस्थान आणि कोलकात्याच्या टीममध्येही होता.

मागच्यावर्षी जानेवारी महिन्यात बिग बॅश लीगच्या फायनलमध्ये सिडनी सिक्सरकडून होबार्टचा पराभव झाल्यानंतर बोथाने अचानक निवृत्ती घेतली होती. पण निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर आपण आधीपेक्षा जास्त फिट असल्याचं बोथा म्हणाला.

दक्षिण आफ्रिकेसाठी बोथाने 5 टेस्ट, 78 वनडे आणि 40 टी-20 मॅच खेळल्या. स्पिनरसोबतच बोथा खालच्या फळीतला उपयुक्त बॅट्समनही होता. 2007 पासून 2011 पर्यंत बोथाने 66 वनडेमध्ये 4.53 च्या इकोनॉमी रेटने 64 विकेट घेतल्या. संपूर्ण कारकिर्दीमध्ये बोथाच्या बॉलिंग ऍक्शनवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. 2009 साली बोथाच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सीरिजमध्ये विजय मिळवला होता.

Published by: Shreyas
First published: December 7, 2020, 12:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या