'तू कुरूप दिसतोस' ट्रोलरच्या या टीकेला उत्तर देऊन आर्चरनं जग जिंकलं

'तू कुरूप दिसतोस' ट्रोलरच्या या टीकेला उत्तर देऊन आर्चरनं जग जिंकलं

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला सोशल मीडियावर वर्णभेदी टीकेला सामोरं जावं लागलं. यावर दिलेल्या उत्तरानं फक्त ट्रोलरची बोलती बंद केली नाही तर सर्वांचं मन जिंकलं.

  • Share this:

लंडन, 10 ऑगस्ट : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरनं वर्ल्ड कपमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. वर्ल्ड कपदरम्यान त्याचे ट्वीट चर्चेत आले होते. चार वर्षांपूर्वी केलेले ट्वीट स्पर्धेवेळी अनेक सामन्यांना लागू पडत होते. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या जोफ्रानं नुकतंच युट्यूब चॅनल सुरू केलं आहे. तिथं एक व्हिलॉग शेअर केल्यानंतर त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. व्हिलॉगमध्ये जोफ्रा आर्चरनं त्याच्या आयुष्याबद्दल सांगितलं होतं.

जोफ्रा आर्चरला ट्रोल करताना त्याच्यावर वर्णभेदी टीका करण्याचा प्रयत्न झाला. यावर जोफ्रानं सहजपणे प्रतिक्रिया दिली. जोफ्राला तू कुरुप आहेस असं एका युजरनं म्हटलं. त्यावर जोफ्रा आर्चरनं तु हॅण्डसम आहेस असं उत्तर दिलं. त्याच्या या उत्तराचं सध्या कौतुक होत आहे.

अॅशेस मालिकेतील पहिल्या कसोटीला दुखापतीनं जोफ्राला मुकावं लागलं होतं. दुसऱ्या कसोटीसाठी त्याची निवड झाली आहे. पहिल्या सामन्यात त्याची उणीव इंग्लंडला भासली. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीसमोर इंग्लंडचे गोलंदाज निष्प्रभ ठरले. विशेषत: स्टीव्ह स्मिथसमोर एकही गोलंदाज यशस्वी ठरला नाही.

अलमट्टी धरणामुळे पुरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप किती खरा? पाहा ऑन द स्पॉट REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 10, 2019 09:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading