Home /News /sport /

टीम इंडियात निवड न झाल्यानं अनुभवी खेळाडू निराश, सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय

टीम इंडियात निवड न झाल्यानं अनुभवी खेळाडू निराश, सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय

अनुभवी फास्ट बॉलर जयदेव उनाडकतकडे (Jaidev Unadkat) निवड समितीनं पुन्हा एकदा दुर्लक्ष केलं आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतरही त्याची टीममध्ये निवड करण्यात आलेली नाही.

    मुंबई, 13 जून:  श्रीलंका दौऱ्यासाठी निवडण्यात (India vs Sri Lanka) आलेल्या टीम इंडियामध्ये सहा नवोदीत खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.  या दौऱ्याच्या काळात विराट कोहलीसह (Virat Kohli) भारतीय टीममधील प्रमुख खेळाडू इंग्लंडमध्ये असतील. त्यामुळे निवड समितीने दुसऱ्या फळीच्या खेळाडूंना संधी दिली आहे. अनुभवी फास्ट बॉलर जयदेव उनाडकतकडे (Jaidev Unadkat) निवड समितीनं पुन्हा एकदा दुर्लक्ष केलं आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतरही त्याची टीममध्ये निवड करण्यात आलेली नाही. निवड समितीच्या या निर्णयानंतर जयदेव उनाडकतनं सोशल मीडिया सोडण्याची घोषणा केली आहे. त्याने ट्विट करुन या निर्णयाची सर्वांना माहिती दिली. आता यापुढे खेळावर आणखी मेहनत करण्याचं त्यानं ठरवलं आहे.  माझी निवड का झाली नाही, याचा विचार न करता शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार त्यानं व्यक्त केला आहे. उनाडकतनं या निर्णायाची माहिती देणाऱ्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, "मी लहान असल्यापासून हा खेळ खेळण्याचा ध्यास आहे. महान खेळाडूंचा मैदानावरील खेळ पाहून मला प्रेरणा मिळाली. मला इतक्या वर्षांपासून तोच अनुभव आला आहे. मी कोणत्याही गोष्टीमध्ये हार न स्वीकारण्याचा दिग्गज खेळाडूंची वृत्ती पाहिली आहे. त्यामधून मी शिकलो आहे. मी तरुण असताना काही जण मला कच्चा समजत असत. त्यांनी माझ्यावर छोट्या शहरातील मोठं स्वप्न पाहणारा असा शिक्का मारला होता. हळूहळू सर्वांचं मत बदललं.  मी देखील बदललो, अधिक परिपर्व झालो. मी यश आणि अपयश या दोन्हीमध्येही स्वत:ला कसं सावरायचं ते शिकलो." आता आणखी मेहनत करणार सौराष्ट्रच्या रणजी विजेतेपदामध्ये मोलाची भूमिका बजावलेल्या उनाडकतने पुढे म्हंटले आहे की, "मी काय चुकीचं केलं? माझी वेळ कधी येणार याबाबत  मी एक क्षण देखील विचार करणार नाही. मी आजवर जो अनुभव घेतला आहे. त्याचा वापर करणार आहे. काही जणांना हा कमकुवतपणा वाटेल, पण मी माझी आक्रमकता मैदानात वापरणार आहे. मला पाठिंबा देणाऱ्या सर्व फॅन्सचा मी आभारी आहे. आता खेळावर अधिक लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी सोशल मीडिया बंद करणार आहे." फुटबॉलनंतर क्रिकेटच्या मैदानात दुर्घटना, फाफ ड्यू प्लेसिस गंभीर जखमी, LIVE VIDEO जयदेव उनाडकतनं 2010 साली दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने सात वन-डे आणि 10 टी 20 मॅचमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचा 2018 नंतर टीम इंडियामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. उनाडकतचा फर्स्ट क्लास आणि टी 20 क्रिकेटमध्ये जबरदस्त रेकॉर्ड आहे. त्याने 89 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 327 तर 150 टी 20 मॅचमध्ये 182 विकेट्स घेतल्या आहेत. 2019-20 च्या रणजी सिझनमध्ये त्याने 67 विकेट्स घेतल्या होत्या. सौराष्ट्रच्या रणजी विजेतेपदाचा तो शिल्पकार होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, India Vs Sri lanka

    पुढील बातम्या