S M L

Video- जसप्रीत बुमराहचा हा अफलातुन यॉर्कर पाहिलात का?

बुमराहने जॅक्सनला बाद केल्यामुळे ५४४ धावांमध्ये ऑस्ट्रेलिया XI चा संपूर्ण संघ तंबूत परतला.

Updated On: Dec 2, 2018 03:20 PM IST

Video- जसप्रीत बुमराहचा हा अफलातुन यॉर्कर पाहिलात का?

सिडनी, ०२ डिसेंबर २०१८- भारत आणि ऑस्ट्रेलिया XI मध्ये खेळण्यात आलेल्या सराव सामना अनिर्णित राहीला. या सराव सामन्यात भारतीय फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी केली. मात्र गोलंदाजांनी सपशेल निराशा केली. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया XI चे फलंदाजांना बाद करताना भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आले.


ऑस्ट्रेलिया XI च्या सलामी जोडीने ११४ धावांची भागीदारी केली. विराट कोहलीने भारताचे सर्वोत्कृष्ट गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहला काही षटकांची विश्रांती दिली होती. मात्र मधल्या षटकांमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचे ६ गडी बाद केले. त्यामुळे टीम इंडिया ऑस्ट्रेलिया XI चा संघ लवकर गारद करेल असे वाटले होते. मात्र तसे की झाले नाही.

ऑस्ट्रेलिया XI संघाने तब्बल ५४४ धावा केल्या. या सामन्याच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहकडून फार कमी गोलंदाजी करवण्यात आली. त्याला फक्त १.१ षटकं गोलंदाजी करायला दिली. मात्र या दरम्यान, सातव्या चेंडूवर त्याने यॉर्कर टाकत जॅक्सन कॉलमनला बाद केले. बुमराहने जॅक्सनला बाद केल्यामुळे ५४४ धावांमध्ये ऑस्ट्रेलिया XI चा संपूर्ण संघ तंबूत परतला.


संगीताच्या कार्यक्रमात पैशांचा तुफान पाऊस, VIDEO पाहून तुम्ही अचंबित व्हाल


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 2, 2018 03:20 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close