जसप्रीत बुमराहनं न्यूझीलंडच्या 'या' बॉलरला दिलं यशाचं श्रेय, पाहा VIDEO

जसप्रीत बुमराहनं न्यूझीलंडच्या 'या' बॉलरला दिलं यशाचं श्रेय, पाहा VIDEO

जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) जगातील अव्वल बॉलरमध्ये समावेश आहे. क्रिकेटच्या सर्व प्रकारात अगदी कमी कालावधीमध्ये बुमराहनं उपयुक्तता सिद्ध केली आहे.

  • Share this:

मुंबई, 14 मे : जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) जगातील अव्वल बॉलरमध्ये समावेश आहे. क्रिकेटच्या सर्व प्रकारात अगदी कमी कालावधीमध्ये बुमराहनं उपयुक्तता सिद्ध केली आहे. बुमराहचे हुकमी यॉर्कर हे अनेकदा टीम इंडियाच्या (Team India) यशाचं दार उघडून देतात. बुमराह आता पुढच्या महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये (WTC Final) टीम इंडियाच्या बॉलिंगचं नेतृत्त्व करणार आहे. बुमराहनं आजवर मिळवलेल्या यशाचं श्रेय न्यूझीलंडच्या माजी फास्ट बॉलरला दिलं आहे.

मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) बुमराहाचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केलाय. यामध्ये त्यानं या यशाचं श्रेय न्यूझीलंडचा माजी फास्ट बॉलर आणि मुंबई इंडियन्सचा बॉलिंग कोच शेन बाँड (Shane Bond) याला दिलं आहे. "मी भारतीय टीम सोबत असतानाही त्याच्याशी नेहमी बोलण्याता प्रयत्न करतो. आजवर हा प्रवास चांगला झाला आहे. आगामी काळात देखील मी दरवर्षी त्याच्याकडून काही तरी शिकण्याचा आणि बॉलिंगमध्ये नवं करण्याचा प्रयत्न करणार आहे.'

बुमराहनं पुढं सांगितलं की, "मी त्याला पहिल्यांदा 2015 साली  भेटलो. त्यावेळी मी लहान होतो. त्याला बॉलिंग करताना पाहूनही मी रोमांचित होत असे. त्याला इथं भेटण्याचा अनुभव चांगला होता. त्यानं मला अनेक बाबतीमध्ये मदत केली आहे. ज्याचा उपयोग मी क्रिकेटच्या मैदानात करतो.''

धोनीबरोबर 10 वर्षांपूर्वी घडली होती घटना, इंग्लंडच्या खेळाडूनं कबूल केला गुन्हा

शेन बाँडनं देखील बुमराहाची जगातील सर्वोत्तम डेथ ओव्हर बॉलर म्हणून प्रशंसा केली आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिजचा माजी फास्ट बॉलर कर्टली एम्ब्रोस देखील बुमराहचा फॅन आहे. बुमराह दीर्घ काळ फिट राहिला तर तो टेस्ट क्रिकेटमध्ये 400 विकेट्स सहज घेईल, असा विश्वास एम्ब्रोसनं व्यक्त केला आहे.

Published by: News18 Desk
First published: May 14, 2021, 2:59 PM IST

ताज्या बातम्या