Home /News /sport /

एकमेकांबद्दल होता गैरसमज, बोलणेही होते बंद! वाचा बुमराह-संजनाची Love Story

एकमेकांबद्दल होता गैरसमज, बोलणेही होते बंद! वाचा बुमराह-संजनाची Love Story

टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यानं मार्च महिन्यात स्पोर्ट्स अँकर संजना गणेशनशी (Sanjana Ganesan) लग्न केलं. बुमराहनं पहिल्यांदाच या प्रकरणाचा खुलासा केला आहे.

    मुंबई, 5 सप्टेंबर : टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यानं मार्च महिन्यात स्पोर्ट्स अँकर संजना गणेशनशी (Sanjana Ganeshan) लग्न केलं. त्यापूर्वी या दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती कुणालाही नव्हती. आता या लग्नाला पाच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. टीम इंडियाचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) दिलेल्या मुलाखतीमध्ये बुमराहनं त्याच्या लव्ह स्टोरीची (Jasprit Bumrah - Sanjana Ganesan Love Story) गोष्ट सांगितली आहे. एकमेकांना समजत होते गर्विष्ठ बुमराहनं या मुलाखतीमध्ये सांगितलं की, आमची एकमेकांशी खूप दिवसांपासून ओळख होती. पण समोरची व्यक्ती गर्विष्ठ आहे, असं समजून आम्ही कधी बोलत नव्हतो. पण क्रिकेट वर्ल्ड कप 2019 च्या दरम्यान दोघांमध्ये पहिल्यांदा बोलणे झाले. त्यानंतर आमच्यात नातं निर्माण झालं. 'मी तिला अनेकदा पाहिलं होतं. पण आमच्या दोघांची एकच अडचण होती. तिला वाटायचं मी गर्विष्ठ आहे. तर ती गर्विष्ठ असल्याचा माझा समज होता. त्यामुळे आम्ही एकमेकांशी कधी बोललो नव्हतो. ती 2019 चा क्रिकेट वर्ल्ड कप कव्हर करत होती. त्यावेळी आमच्यात बोलणे झाले. त्यानंतर आम्ही एकमेकांचे मित्र बनलो. आता आमच्या लग्नाला पाच महिने झाले असून आम्ही आनंदी आहोत, ' असं बुमराहनं सांगितलं. IPL 2021: चेन्नईसाठी Good News, धोनीच्या मित्रानं झळकावलं वादळी शतक संजनाला खेळ समजतो, याचा मला फायदा होतो असं बुमराहनं सांगितलं. 'संजना खेळ समजत असल्यानं खेळाडू कोणत्या परिस्थितीमधून जातात याची तिला कल्पना आहे. आमच्याकडं गप्पा मारण्यासाठी अनेक विषय आहेत. त्याचा आम्हाला फायदा होतो. क्रिकेट खेळणे आणि त्यामुळे होणाऱ्या प्रवासात पत्नी तुमच्या बरोबर असेल तर अन्य गोष्टींकडं लक्ष देणे तुम्हाला शक्य होते. तुम्ही मॅचनंतर त्यामधून बाहेर पडू शकता.' असे बुमराहने यावेळी स्पष्ट केले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket, Jasprit bumrah, Love story

    पुढील बातम्या