विराट-रोहित नाही तर हा आहे टीम इंडियाचा यावर्षी सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू

विराट-रोहित नाही तर हा आहे टीम इंडियाचा यावर्षी सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू

भारतीय क्रिकेट टीमचा सगळ्यात जास्त कमाई करणारे खेळाडू म्हणून सगळ्यांसमोर विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांची नावं समोर येतात.

  • Share this:

मेलबर्न, 26 डिसेंबर : भारतीय क्रिकेट टीमचा सगळ्यात जास्त कमाई करणारे खेळाडू म्हणून सगळ्यांसमोर विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांची नावं समोर येतात. एमएस धोनी (MS Dhoni) क्रिकेटमधून निवृत्त घेतली असली तरी तो बहुतेक क्रिकेटपटूंपेक्षा जास्त कमावतो. 2020 हे वर्ष मात्र क्रिकेटपटूंसाठी वेगळे आकडे घेऊन आलं आहे. यावर्षी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सर्वाधिक कमाई करणारा क्रिकेटपटू ठरला. बुमराहने विराट कोहलीला पिछाडीवर टाकलं आहे. या यादीत रोहित शर्मा टॉप-5 मध्येही नाही.

जसप्रीत बुमराहने भारताकडून 2020 साली 4 टेस्ट, 9 वनडे आणि 8 टी-20 खेळल्या. बीसीसीआय (BCCI) भारतीय क्रिकेटपटूंना एका टेस्टसाठी 15 लाख रुपये देतं, तर प्रत्येक वनडेला 6 लाख आणि एका टी-20 मॅचला 3 लाख रुपये देतं. त्यामुळे बुमराहने 2020 साली 1.38 कोटी रुपये कमावले. ही रक्कम बुमराहच्या कराराच्या रकमे व्यतिरिक्त आहे.

विराट कोहली भारताकडून यावर्षी 3 टेस्ट, 9 वनडे आणि 10 टी-20 खेळला. त्यामुळे विराटची मॅच खेळून झालेली कमाई 1.29 कोटी रुपये एवढी झाली. विराट ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टनंतर पितृत्वाच्या रजेसाठी भारतात परतला, त्यामुळे वर्षाची शेवटची टेस्ट विराट खेळला नाही. जर विराट ही टेस्ट खेळला असता तर त्याने यावर्षी मॅच खेळून एकूण 1.44 कोटी रुपये कमावले असते.

बुमराह आणि कोहलीनंतर रविंद्र जडेजाने भारताकडून सर्वाधिक कमाई केली. जडेजाने यावर्षी 2 टेस्ट, 9 वनडे आणि 4 टी-20 मॅच खेळल्या, त्यामुळे जडेजाने 96 लाख रुपये कमावले. तर रोहित शर्मा सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये टॉप-5 मध्येही नाही. खराब फिटनेसमुळे रोहित शर्माला यावर्षी बऱ्याच मॅच मुकाव्या लागल्या. रोहितने यावर्षभरात 3 वनडे आणि 4 टी-20 मॅच खेळल्या, त्यामुळे रोहितला मॅच खेळून 30 लाख रुपये मिळाले.

Published by: Shreyas
First published: December 26, 2020, 12:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या