Home /News /sport /

हा भारतीय खेळाडू मोडेल सगळी रेकॉर्ड, ऑस्ट्रेलियाच्या जेसन गिलेस्पीची भविष्यवाणी

हा भारतीय खेळाडू मोडेल सगळी रेकॉर्ड, ऑस्ट्रेलियाच्या जेसन गिलेस्पीची भविष्यवाणी

ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर जेसन गिलेस्पी (Jason Gillespie) ने भारतीय फास्ट बॉलरचं कौतूक केलं आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) त्याची कारकिर्द संपवेल तेव्हा भारताचा तिन्ही फॉरमॅटमधला सगळ्यात यशस्वी बॉलर ठरेल, असं गिलेस्पी म्हणाला आहे.

पुढे वाचा ...
    सिडनी, 14 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय टीम सिडनीमध्ये दाखल झाली आहे. 27 नोव्हेंबरपासून या दौऱ्याला वनडे सीरिजपासून सुरुवात होईल. वनडे सीरिज संपल्यानंतर टी-20 सीरिज आणि टेस्ट सीरिज खेळवण्यात येणार आहे. मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने वनडे आणि टेस्ट सीरिज जिंकली होती, पण त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यासारखे दिग्गज खेळाडू नव्हते, यावेळी मात्र भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अटीतटीची लढत होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या या सीरिजला सुरुवात होण्याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर जेसन गिलेस्पी (Jason Gillespie) ने भारतीय फास्ट बॉलरचं कौतूक केलं आहे. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) त्याची कारकिर्द संपवेल तेव्हा भारताचा तिन्ही फॉरमॅटमधला सगळ्यात यशस्वी बॉलर ठरेल, असं गिलेस्पी म्हणाला आहे. स्पोर्ट्स स्टारशी बोलताना गिलेस्पीने भारताच्या फास्ट बॉलरची प्रशंसा केली. 'भारताचं सध्याचं बॉलिंग आक्रमण सर्वोत्तम आहे. भारताचा प्रत्येक फास्ट बॉलर वेगळा आहे. मागच्या काही वर्षांमधलं हे सर्वोत्कृष्ठ बॉलिंग आक्रमण आहे. बुमराह जेव्हा कारकिर्द संपवेल, तेव्हा तो सुपरस्टार असेल. बुरमाह भारताचा महान बॉलर सिद्ध होईल. यामध्ये कोणतंही दुमत नाही', अशी प्रतिक्रिया गिलेस्पीने दिली. जेसन गिलेस्पीने मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा हेदेखील उत्कृष्ट बॉलर असल्याचं सांगितलं. इशांत शर्मा कायमच त्याच्या कामगिरीमध्ये सुधारणा करतो आणि परिस्थितीशी जुळवून घेतो, असं गिलेस्पी म्हणाला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जी टीम खेळपट्टीवर योग्य टप्पा लवकर पकडेल त्यांचा विजय होईल, असं गिलेस्पीला वाटतं. भारतातल्या खेळपट्ट्यांपेक्षा ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्या या वेगळ्या असतात. मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय फास्ट बॉलरनी चांगली कामगिरी केली होती, त्यामुळे यावेळीही बुमराह, शमी वॉर्नर आणि स्मिथ या दिग्गजांना त्रास देऊ शकतात.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या