मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'टीम इंडियाच्या क्रिकेटपटूला फाशीसाठी लांब दोरखंड द्या', अधिकाऱ्याच्या प्रतिक्रियेनं खळबळ

'टीम इंडियाच्या क्रिकेटपटूला फाशीसाठी लांब दोरखंड द्या', अधिकाऱ्याच्या प्रतिक्रियेनं खळबळ

टीम इंडियाचा क्रिकेटपटू परवेज रसूलवर (Parvez Rasool) चोरीचा आरोप करण्यात आला आहे.

टीम इंडियाचा क्रिकेटपटू परवेज रसूलवर (Parvez Rasool) चोरीचा आरोप करण्यात आला आहे.

टीम इंडियाचा क्रिकेटपटू परवेज रसूलवर (Parvez Rasool) चोरीचा आरोप करण्यात आला आहे.

    मुंबई, 21 ऑगस्ट : टीम इंडियाचा क्रिकेटपटू परवेज रसूलवर (Parvez Rasool) चोरीचा आरोप करण्यात आला आहे. जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशननं त्याच्यावर रोलर चोरी केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर या प्रकरणात पोलीस कारवाई करण्याचा इशाराही दिलीा आहे. या प्रकरणात आपला छळ केला जात असल्याचा आरोप रसूलनं केला आहे. त्याने बीसीसीआयकडं (BCCI) यामध्ये  हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. अधिकाऱ्याचं वादग्रस्त वक्तव्य परवेज रसूलनं या विषयावर एक धक्कादायक आरोप केला आहे. 'रसूलला लांब दोरखंड देण्यात यावे. ज्यामुळे तो स्वत:ला गळफास घेऊ शकेल, अशी प्रतिक्रिया एका अधिकाऱ्यानं दिली होती. त्यानंतर त्यानं ती प्रतिक्रिया डिलिट केली.' असा दावा त्यानं केला आहे. रसूल हा जम्मू काश्मीरचा प्रमुख खेळाडू असून त्यानं दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांममध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. काय आहे प्रकरण?  जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशननं (Jammu & Kashmir Cricket Association) एका हरवलेल्या पिच रोलरसंदर्भात (Pitch Roller) काश्मीरमधील दिग्गज क्रिकेटपटू परवेज रसूल (Parvez Rasool) याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.  क्रिकेट असोसिएशननं रसूलला नोटीस पाठवली असून पिच रोलर चोरी केल्याचा आरोप केला आहे. हे पिच रोलर परत दिलं नाही तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही बोर्डानं दिला आहे. या विषयावर गदारोळ झाल्यानंतर असोसिएशननं स्पष्टीकरण दिलं आहे. 'आम्ही फक्त परवेज रसूल नाही तर सर्व जिल्हा क्रिकेट असोसिएशनला ईमेल केला आहे. रसूलचे नाव त्याच्या जिल्हा क्रिकेटच्या सोबत होते. त्यामुळे त्यालाही हा ईमेल गेला आहे. त्यानंतर तो दुखावला गेला आहे. ...तर भारतीय ऑलिम्पिकपटूंची कुस्ती बंद! फेडरेशनचा खेळाडूंना गंभीर इशारा जिल्हा असोसिएशनला कोणत्याही पावतीशिवाय हे साहित्य वाटण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षापासून असोसिएशनचं ऑडिट झालेलं नाही. आम्हाला हे ऑडिट पूर्ण करायचं आहे. कोर्टानं देखील याबाबत तसा आदेश दिला आहे.' असे स्पष्टीकरण  जेकेसीएचे सदस्य आणि भाजपा प्रवक्ता अनिल गुप्ता यांनी दिलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या