अनंतनाग, 12 जुलै : इंग्लंडमध्ये क्रिकेटच्या रणसंग्रामाचा शेवटचा सामना चार दिवसांवर आला आहे. क्रिकेटचा नवा जग्गजेता कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. दरम्यान, क्रिकेटच्या मैदानातून एक दुखद बातमी आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये एका युवा क्रिकेटपटूचा मैदानावरच मृत्यू झाला आहे. दक्षिण काश्मिरमध्ये अनंतनागमध्ये बारामुला आणि बडगाम यांच्यातील सामन्यावेळी फलंदाजाचा चेंडू डोक्याला लागून जागीच मृत्यू झाला.
क्रिकेटच्या मैदानातच मृत्यू झालेल्या खेळाडूचे नाव जहागिर अहमद वार आहे. 17 वर्षीय जहांगिर बाउन्सरवर फटका मारत असताना चेंडू थेट डोक्यावर आदळला. त्यानंतर जहांगिर मैदानवरच कोसळला. त्याला रुग्णालयाच नेण्यात आले पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
बारामुला क्रिकेट संघाचा तो सलामीवीर फलंदाज होता. जहांगिर 11 वी मध्ये शिकत होता. दक्षिण काश्मिरमधील गोशबाग इथं राहणाऱ्या या खेळाडूच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. यूथ सर्व्हिस आणि स्पोर्ट्स डायरेक्टर जनरल यांनी दु:ख व्यक्त केलं. ते म्हणाले की, जहांगिरी माझ्या मुलासारखा होता. त्याला रुण्गालयात दाखल करण्यापूर्वी रुग्णालय प्रशासनाला कल्पना दिली होती मात्र, तिथं पोहचण्यापूर्वीच जहांगिरचा मृत्यू झाला होता.
याआधी क्रिकेटच्या मैदानात ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फिलिप ह्युजेसचा अशाच पद्धतीने मृत्यू झाला होता. तर भारताचे माजी क्रिेकेटपटू रमण लांबा यांचाही मृत्यू चेंडू डोक्यात लागून झाला होता. फक्त खेळाडूच नाही तर वेल्समध्ये एका क्लब सामन्यात पंचांच्या डोक्यात चेंडू लागून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
VIDEO : RSSच्या शाखेत दोन गटात तुफान हाणामारी