IND vs AUS : टीम इंडियासाठी चांगली बातमी, या खेळाडूंचं पुनरागमन होणार!

IND vs AUS : टीम इंडियासाठी चांगली बातमी, या खेळाडूंचं पुनरागमन होणार!

भारतीय क्रिकेट टीम (Team India) सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचच्या या दौऱ्याची सुरुवात 27 नोव्हेंबरपासून वनडे सीरिजने होणार आहे. हा दौरा सुरू होण्याआधी टीम इंडियाला दिलासादायक बातमी मिळाली आहे.

  • Share this:

मुंबई, 18 नोव्हेंबर : भारतीय क्रिकेट टीम (Team India) सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. तीन वनडे, तीन टी-20 आणि चार टेस्ट मॅचच्या या दौऱ्याची सुरुवात 27 नोव्हेंबरपासून वनडे सीरिजने होणार आहे. वनडेनंतर टी-20 सीरिज खेळवली जाईल. यानंतर 17 डिसेंबरपासून दोन्ही टीममध्ये टेस्ट सीरिजला सुरुवात होईल. ऍडलेडमधली पहिली टेस्ट डे-नाईट असणार आहे. परदेशामध्ये भारताची ही पहिलीच डे-नाईट टेस्ट मॅच असणार आहे. या टेस्ट सीरिजआधी टीम इंडियासाठी चांगली बातमी आहे. फास्ट बॉलर इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि विकेट कीपर ऋद्धीमान सहा (Wriddhiman Saha) यांचं टेस्ट सीरिजसाठी टीममध्ये पुनरागमन होण्याची शक्यता आहे.

आयपीएल (IPL 2020) दरम्यान हे दोन्ही खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. ऋद्धीमान सहा टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला गेला आहे, तर इशांत शर्मा बँगलोरच्या एनसीएमध्ये आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी दोन्ही खेळाडू फिट होण्याची शक्यता अधिक आहे. इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार एनसीएमध्ये राहुल द्रविडच्या निरिक्षणात इशांतची फिटनेस टेस्ट घेण्यात आली आणि इशांतच्या फिटनेसवर सगळे खुश आहेत.

इशांत शर्मा दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे आणि नेटमध्ये बॉलिंगचा सरावही करत आहे. जर त्याला फिट घोषित करण्यात आलं, तर इशांत ऑस्ट्रेलियात टीम इंडियाशी जोडला जाईल. ऍडलेडमध्ये होणाऱ्या पहिल्या टेस्टआधी टीम इंडिया 6 ते 8 डिसेंबर आणि 11 ते 13 डिसेंबरमध्ये दोन सराव सामने खेळणार आहे.

टी-20 टीम

विराट कोहली, शिखर धवन, मयंक अग्रवाल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी नटराजन

वनडे टीम

विराट कोहली, शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रविंद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकुर, संजू सॅमसन

टेस्ट टीम

विराट कोहली, रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान सहा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव,रविंद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद सिराज

Published by: Shreyas
First published: November 18, 2020, 9:10 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading