S M L

इरफान पठाण खरंच राजकारणाचा बळी ठरलाय का ?

इरफान सारख्या स्टार ऑलराउंडर खेळाडूसोबत त्याची स्थानिक क्रिकेट संघटना असा व्यवहार करेल असं कोणालाही वाटलं नसेल.

Sachin Salve | Updated On: Oct 31, 2017 09:41 PM IST

इरफान पठाण खरंच राजकारणाचा बळी ठरलाय का ?

31 आॅक्टोबर : मागच्या अनेक वर्षांपासून इरफान पठाण अनेक समस्यांशी लढत आहे. 5 वर्ष टीम इंडियापासून तो बाहेर राहिला. त्याच बरोबर 2017च्या आयपीएल लिलावामध्येही त्याला दुर्लक्षित करण्यात आलं.

इरफान सारख्या स्टार ऑलराउंडर खेळाडूसोबत त्याची स्थानिक क्रिकेट संघटना असा व्यवहार करेल असं कोणालाही वाटलं नसेल.

रणजी ट्रॉफीच्या संपूर्ण सिझनसाठी इरफानची कर्णधारपदी निवड करण्यात आली होती पण फक्त दोन सामन्यानंतरच त्याला रणजी संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.माजी भारतीय खेळाडू किरण मोरे यावर म्हणाले की, 'हे अतिशय दुर्दैवी आहे, मी यावर काहीही बोलू इच्छित नाही. मी बडोदा क्रिकेटमध्ये सहभागी झालो नाही. पण आता जे काही झालं त्याचं मला खूप दुःख आहे.'

टीम मधून काढून टाकल्यानंतर पठानने ट्विट केलं आणि म्हणाला की, 'गुड मॉर्निंग न म्हणणं आणि आपल्या बॉसच्या आदेशाचं पालन न करणं आपल्यासाठी धोक्याचं आहे. पण काळजी करु नका आणि आपलं काम करत रहा.'

जेव्हा मीडियाने याविषयी पठाणला विचारलं असता त्यावर तो म्हणाला, 'मी एक फाइटर आहे आणि मी माझा रस्ता शोधूनच काढणे. हेच माझं आयुष्य आहे आणि हेच माझं क्रिकेट आहे.'

Loading...

वर्ल्ड टी-20 फायनल चॅम्पियन टीमचा मॅन ऑफ द मॅच इरफान पठाणला याचं किती वाईट वाटलं आहे हे त्याच्या या आवाजावरुनच स्पष्ट होतं.

आशिष नेहरा यांने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितलं की, भारतात 30 वर्षां आधीपासून क्रिकेटपटूंना वाईट वागणूक दिली जाते. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक क्रिकेटपटूं माझ्याकडे आले, माझ्याशी बोलले. मी त्यांना सांगितले की मी 38 वर्षांपर्यंत खेळू शकतो, तर तेही खेळू शकतात. मग हा अन्याय का? भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा पहिला टी -20 सामना झाल्यानंतर आशिष नेहरा निवृत्त होणार आहेत.

आशिष नेहरा यांनाही राज्य निवडणूकीत अनेक वेळा निराश केलं आहे. पठाण देखील नेहरांच्या याच अनुभवातून शिकू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2017 09:41 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close