इरफानने जिंकलं मन! काश्मीर सोडण्याच्या आदेशानंतर इतर खेळाडूंना पोहोचवलं घरी, नंतरच सोडलं राज्य

इरफानने जिंकलं मन! काश्मीर सोडण्याच्या आदेशानंतर इतर खेळाडूंना पोहोचवलं घरी, नंतरच सोडलं राज्य

काश्मीरमधील तणापूर्ण वातावरणामुळं पर्यटकांसह इतर राज्यातील नागरिकांना परत जाण्याचे आदेश देण्यात आले होते.

  • Share this:

श्रीनगर, 05 ऑगस्ट : जम्मू काश्मीरमधील वातावरण तणापूर्ण झालं आहे. पर्यटकांना जम्मू काश्मीरमधून आपआपल्या राज्यात जाण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान, जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशननं भारताचा क्रिकेटपटू इरफान पठाण आणि त्याच्यासोबत 100 हून अधिक खेळाडूंना काश्मीरमधून तात्काळ परतण्याचे आदेश दिले होते. इरफान पठाण आणि त्याचासोबत असलेल्या सपोर्ट स्टाफमधील इतर लोक रविवारीच तिथून परतले. काश्मीरमधील लोकांनीच राज्यात थांबावं असा आदेश सरकारकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, भारताचा क्रिकेटपटू इरफान पठाणने काश्मीर सोडण्यापूर्वी तिथल्या स्थानिक मुलांना आधी घरी सोडले. त्याबद्दल इरफान म्हणाला की, मुलं सुरक्षित घरी पोहचणं महत्त्वाचं होतं. त्यांचे कुटुंबीय चिंतेत होते. अशावेळी काश्मीर सोडून मी सुरक्षित बाहेर पडणं योग्य वाटलं नाही. त्यांच्या घरी पोहोचल्याची खात्री केली. सर्व मुलं घरी पोहोचल्यानंतर काश्मीर सोडलं असंही इरफान पठाणने सांगितलं.

सध्याची काश्मीरमधील परिस्थिती पाहता जेकेसीएनं घेतलेल्या निर्णयाचा स्वीकार करायला हवा. लवकरच सर्व सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे. चांगली तयारी आणि योग्य निवड व्हावी यासाठी जूनमध्येच शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं असं इरफान म्हणाला.

जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बुखारी यांनी खेळाडूंनी परतण्याबाबत रविवारी माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, कँपमध्ये असलेल्या जवळपास 102 खेळाडूंना परत पाठवलं आहे. इथली परिस्थिती तणावपूर्ण असून काय चाललं आहे हे कळत नाही. इथं होणाऱ्या क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर स्पर्धा घेतली जाणार आहे.

ऑगस्ट महिन्यापासून घरेलू क्रिकेट सामने सुरू होणार होते. जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशननं राज्यातील क्रिकेटर्सच्या निवडीसाठी आणि प्रशिक्षणासाठी शिबिर भरवलं होतं. यामध्ये अंडर 23 आणि वरिष्ठ गटातील खेळाडूंचे आठ संघ तयार करण्यात आले होते.

17 ऑगस्टपासून दुलीप ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफी, देवधर ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी होणार आहे. रणजी ट्रॉफीच्या लीग राउंडला 9 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. 2019-20 च्या घरेलू सत्रात सर्व प्रकारात मिळून 2 हजार 36 सामने होणार आहेत. यात काही सामने जम्मू काश्मीरमध्ये होणार होते.

VIDEO: नेते नजरकैदेत, कलम 144 लागू; काय आहे जम्मूची आताची स्थिती?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2019 10:04 AM IST

ताज्या बातम्या