Home /News /sport /

IND vs AUS : इरफान पठाण म्हणतो, 'विराटच्या अनुपस्थितीमध्ये याला करा कर्णधार'

IND vs AUS : इरफान पठाण म्हणतो, 'विराटच्या अनुपस्थितीमध्ये याला करा कर्णधार'

आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. पहिली टेस्ट झाल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतणार आहे. अजिंक्य (Ajinkya Rahane) हा टेस्ट टीमचा उपकर्णधार असल्यामुळे त्याच्याकडे विराटच्या अनुपस्थितीमध्ये कर्णधारपद जाईल

पुढे वाचा ...
    मुंबई, 9 नोव्हेंबर : आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत 3 वनडे, 3 टी-20 आणि 4 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. पण या दौऱ्यातली पहिली टेस्ट झाल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराट दौरा अर्धवट सोडून येणार आहे. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हा टेस्ट टीमचा उपकर्णधार असल्यामुळे त्याच्याकडे विराटच्या अनुपस्थितीमध्ये कर्णधारपद जाईल, पण इरफान पठाण (Irfan Pathan) याने मात्र रोहित शर्मा (Rohit Sharma) याला कर्णधार बनवण्याची मागणी केली आहे. इरफान पठाण पीटीआय-भाषासोबत बोलत होता. विराटच्या अनुपस्थितीमुळे भारताचं नुकसान होईल, पण त्याच्या निर्णयाचा आपण सन्मान केला पाहिजे. क्रिकेटच्या बाहेरही आयुष्य आहे, हे आपण स्वीकारलं पाहिजे. कुटुंब खूप महत्त्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया इरफानने दिली. 'विराटच्या मैदानात नसल्यामुळे बराच फरक पडेल. दुसऱ्या कोणाला विराटची जागा घेणं कठीण आहे. एवढ्या वर्षांपासून विराटने जी कामगिरी केली आहे, तीही अशा परिस्थितीमध्ये. रोहितने आयपीएलमध्ये मुंबईचं नेतृत्व करत 4 आयपीएल जिंकल्या. एवढच नाही तर निदहास ट्रॉफी आणि आशिया कपमध्येही रोहितच्या नेतृत्वात भारत जिंकला. रहाणेच्या विरुद्ध काहीही नाही, पण रोहितने कर्णधार व्हावं. रोहित एक उत्तम कर्णधार आहे आणि त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे. तसंच त्याच्याकडे गरजेचा असलेला अनुभवही आहे,' असं इरफान म्हणाला. ओपनर म्हणून महत्त्वाची भूमिका ओपनर म्हणून रोहित शर्माची भूमिका महत्त्वाची असेल. रोहित ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यासारखा खेळाडू आहे. 2008 सालच्या वनडे सीरिजमध्ये रोहित नवखा होता, पण त्याने ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर चांगली कामगिरी केली. दुखापतीनंतरही तो उत्कृष्ट खेळ दाखवण्यासाठी उत्सूक असेल. विरोधी टीमसाठी रोहितसारखा धोकादायक बॅट्समन असूच शकत नाही. परदेशात खेळणं हे कायमच कठीण असतं, त्यामुळे रोहित फॉर्ममध्ये असेल तर परिस्थितीचं महत्त्व राहत नाही, असं वक्तव्य इरफानने केलं. 2004 सालच्या दौऱ्यात सेहवागने जी भूमिका बजावली होती, तीच भूमिका रोहित ऑस्ट्रेलियामध्ये बजावेल. चेतेश्वर पुजारा सगळ्या बॅटिंग ऑर्डरला जोडण्याचं काम करेल. तर विराटच्या अनुपस्थितीमध्ये रहाणे चौथ्या क्रमांकावर योग्य राहिल, असं इरफानला वाटतंय. पुजारा मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मॅन ऑफ द सीरिजही राहिला होता. त्या दौऱ्यात भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकत इतिहास घडवला होता.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या