मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /टीम इंडियाकडून मिळाली नाही संधी, चहलच्या मित्राचा आयर्लंडकडून इतिहास! 50 वर्षांमधील पहिली घटना

टीम इंडियाकडून मिळाली नाही संधी, चहलच्या मित्राचा आयर्लंडकडून इतिहास! 50 वर्षांमधील पहिली घटना

आयर्लंडकडून ऑल राऊंडर सिमी सिंह (Simi Singh) याने 8 व्या नंबरवर बॅटींगसाठी आल्यानंतरही शतक झळकावले. ही कामगिरी करणारा तो वन-डे क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच क्रिकेटपटू आहे. सिमी मुळचा भारतीय आहे.

आयर्लंडकडून ऑल राऊंडर सिमी सिंह (Simi Singh) याने 8 व्या नंबरवर बॅटींगसाठी आल्यानंतरही शतक झळकावले. ही कामगिरी करणारा तो वन-डे क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच क्रिकेटपटू आहे. सिमी मुळचा भारतीय आहे.

आयर्लंडकडून ऑल राऊंडर सिमी सिंह (Simi Singh) याने 8 व्या नंबरवर बॅटींगसाठी आल्यानंतरही शतक झळकावले. ही कामगिरी करणारा तो वन-डे क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच क्रिकेटपटू आहे. सिमी मुळचा भारतीय आहे.

मुंबई, 17  जुलै : आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IRE vs SA) यांच्यात डब्लिनमध्ये  झालेल्या तिसऱ्या वन-डेमध्ये दोन्ही टीमकडून चांगली बॅटींग पाहयला मिळाली. या मॅचमध्ये एकूण 3 जणांनी शतक केले. दक्षिण आफ्रिकेकडून जानेमन मलान (Janneman Malan) आणि क्विंटन डिकॉक (Quinton de Kock) या दोघांनी शतक केले. तर आयर्लंडकडून ऑल राऊंडर सिमी सिंह (Simi Singh) याने 8 व्या नंबरवर बॅटींगसाठी आल्यानंतरही शतक झळकावले. त्याने 91 बॉलमध्ये 100 रन काढले. त्याच्या शतकानंतरही दक्षिण आफ्रिकेनं आयर्लंडचा 70 रननं पराभव केला. याबरोबर आयर्लंड- दक्षिण आफ्रिका वन-डे मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली.

टीम इंडियात मिळाली नाही संधी

सिमी सिंहनं या शतकाच्या दरम्यान एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. वन-डे क्रिकेटच्या 50 वर्षांच्या इतिहासात आठ किंवा त्याच्यापेक्षा खालच्या क्रमांकावर बॅटींगला आल्यानंतरही शतक करणारा सिमी हा पहिला क्रिकेटपटू बनला आहे. ही ऐतिहासिक कामगिरी करणारा सिमी हा मुळचा भारतीय आहे. तो भारतामध्ये अंडर-19 क्रिकेट खेळला आहे. त्याला पुढे संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याने आयर्लंडमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि इतिहास रचला.

पंजाब ते आयर्लंड प्रवास

सिमी सिंहचं पूर्ण नाव सिमरजीत सिंह आहे. त्याचा जन्म 1987 साली पंजाबमधील बठनालामध्ये झाला. सिमीनं अंडर-14, अंडर-17 आणि अंडर-19 स्तरावरील क्रिकेट एकत्र खेळलं आहे. चंदीगडच्या डीवी कॉलेजमध्ये सिमी टीम इंडियाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहलबरोबर (Yuzvendra Chahal) क्रिकेट खेळला आहे. तसेच तो सिद्धार्थ कौलचा देखील मित्र आहे. पंजाबच्या अंडर-19 टीममध्ये निवड न झाल्यानं त्यानं क्रिकेट सोडून आयर्लंडमध्ये शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय घेतला.

सिमीनं शिक्षणासाठी आयर्लंड गाठलं होतं, पण तिथंही त्यानं क्रिकेटचं मैदान गाजवले. आयर्लंडच्या स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर 2017 साली सिमीची आंतरराष्ट्रीय टीममध्ये निवड झाली. 14 मार्च 2017 रोजी त्याने न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण केले.

PAK vs ENG: वन-डे मालिकेतील नामुश्कीनंतर पाकिस्तानचं कमबॅक, T20 मध्ये केला रेकॉर्ड

सिमी सिंहची कारकिर्द

सिमी सिंहनं आयर्लंडकडून आजवर 30 वन-डे मध्ये  34  तर 24 टी 20 सामन्यात 21 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने वन-डे कारकिर्दीमध्ये 26 इनिंगमध्ये 24.68 च्या सरासरीनं 543 रन केले आहेत. त्याला भारताकडून अधिक संधी मिळाली नाही. मात्र त्याने आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचं स्वप्न पूर्ण करत नवा इतिहास रचला आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket news, Punjab