मुंबई, 17 जुलै : फायनल मॅचचा दबाव आणि एका ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 35 रनची आवश्यकता असल्यास सामान्य परिस्थितीमध्ये कोणत्याही टीमला विजय हा अशक्य वाटू शकतो. मात्र आयर्लंडच्या बॅट्समननं हे अशक्य आव्हान पूर्ण केलं आहे. लगान व्हॅली स्टील्स टी20 स्पर्धेच्या फायनलमध्ये त्याने ही कामगिरी केली आहे. या फायनलमध्ये आयरिश क्लबला बालीमोनोला क्रेगाघो विरुद्ध विजयासाठी एका ओव्हरमध्ये 35 रनची आवश्यकता होती. या अवघड आव्हानामुळे क्रेगघो जिंकणार असाच सर्वांचा अंदाज होता. पण, त्याचवेळी मैदानात वादळ आलं.
हे वादळ नैसर्गिक नव्हतं. तर जॉन ग्लास (Johan Glass) या बॅट्समनच्या आक्रमक खेळीमुळे आलं होतं. त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये सलग 6 सिक्स लगावत टीमला विजेतेपद मिळवून दिले. ग्लास अखेरीस 87 रनवर नाबाद परतला. 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराचा मानकरी देखील तोच ठरला.
JOHN GLASS TAKE A BOW!
He has just hit 36 off the final over and Ballymena are the 2021 Lagan Valley Steels 2021 champions. What an innings from the skipper. #ncut20t pic.twitter.com/afatC6Q7co — Northern Cricket Union (@NCU_News) July 15, 2021
ग्लासच्या मोठ्या भावाची कमाल
क्रेगाघो टीमनं पहिल्यांदा बॅटींग करताना निर्धारित ओव्हर्समध्ये 7 आऊट 147 रन काढले. जॉन ग्लासचा मोठा भाऊ सॅम ग्लासनं बॉलिंगमध्ये कमाल केली. त्याने भेदक बॉलिंग करत हॅट्ट्रिक घेतली.
PAK vs ENG : 110 किलो वजनाच्या खेळाडूनं केलं पाकिस्तानकडून पदार्पण
148 रनचा पाठलाग करताना बालीमोनोची सुरूवात खराब झाली. त्यांचे ओपनर्स झटपट परतले. त्यानंतर जॉन ग्लासने टीमली सावरले. शेवटच्या ओव्हर सुरु होण्यापूर्वी त्यांचा स्कोअर 7 आऊट 113 होता. त्यावेळी ग्लासनं सलग 6 सिक्स लगावत स्वप्नवत विजय मिळवून दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news