मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

मोठी बातमी! वन-डे क्रिकेटमधील पहिलीच घटना, आयर्लंडनं केला दक्षिण आफ्रिकेचा पराभव

मोठी बातमी! वन-डे क्रिकेटमधील पहिलीच घटना, आयर्लंडनं केला दक्षिण आफ्रिकेचा पराभव

वन-डे क्रिकेटमध्ये 12 व्या रँकिंगवर असलेल्या आयर्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 43 रननं पराभव करत इतिहास घडवला आहे. (Ireland beat South Africa by 43 runs)

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 14 जुलै : वन-डे क्रिकेटमध्ये 12 व्या रँकिंगवर असलेल्या आयर्लंडनं दक्षिण आफ्रिकेचा 43 रननं पराभव करत इतिहास घडवला आहे. (Ireland beat South Africa by 43 runs) डब्लिनमध्ये झालेल्या दुसऱ्या वन-डेमध्ये आयर्लंडचा कॅप्टन अँडी बालबर्नीच्या (Andy Balbirnie) शतकी खेळाच्या जोरावर 290 रन काढले होते. 291 रनचा पाठलाग करता आफ्रिकेची टीम पूर्ण 50 ओव्हर्स देखील खेळू शकली नाही.

आयर्लंडनं पहिल्यांदा बॅटींग करताना अँडी बालबर्नी आणि हॅरी टेक्टर यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर आफ्रिकेला आव्हानात्मक टार्गेट दिले. बालबर्नीनं 117 बॉलमध्ये 102 रन काढले. या खेळीत 10 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. तर टेक्टरनं शेवटच्या ओव्हर्समध्ये आक्रमक खेळी केली. त्याने 6 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं 79 रन काढले. त्याचबरोबर जॉर्ज डॉकरेलनं 23 बॉलमध्ये 45 रन काढत आयर्लंडचा स्कोअर वाढवण्यात योगदान दिले.

291 रनचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर जानेमन मलान (Janeman Malan) याने 84 रन काढले. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या विकेट्स या ठराविक अंतराने गेल्या. एकही मोठी पार्टनरशिप न झाल्यानं आफ्रिकेला मॅचमध्ये कमबॅक करता आले नाही. त्याचबरोबर फॉर्मातील क्विंटन डी कॉकला आराम देण्याचा निर्णयही आफ्रिकेसाठी महाग ठरला.

सहा महिन्यांपूर्वी टेस्ट टीमचा कॅप्टन, आता लष्करामध्ये दाखल झाला क्रिकेटपटू

या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे होऊ शकला नाही. आता दुसरा सामना जिंकत आयर्लंडनं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या विजयाबरोबरच आयर्लंडनं 2023 च्या वर्ल्ड कपसाठी थेट क्वालिफाय करण्याच्या आशा वाढवल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेला ही हार महाग पडू शकते. त्यांच्या कामगिरीत लवकर सुधारणा झाली नाही तर त्यांच्यावर आगामी वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी पात्र होण्यासाठी पात्रता फेरी खेळण्याची नामुश्की येऊ शकते.

First published:

Tags: Cricket, South africa