Home /News /sport /

'कोरोनातून बरं होणं म्हणजे...' वरुण चक्रवर्तीनं सांगितला 2 आठवड्यांचा अनुभव

'कोरोनातून बरं होणं म्हणजे...' वरुण चक्रवर्तीनं सांगितला 2 आठवड्यांचा अनुभव

चेन्नई सुपर किंग्सचे (CSK) बॉलिंग कोच एल. बालाजी (L. Balaji) आणि कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) स्पिनर वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) यांना कोरोनाची लागण झाली होती. हे दोघंही आता बरे झाले असून त्यांनी कोरोनाकाळातील अनुभव सांगितला आहे.

पुढे वाचा ...
    चेन्नई, 22 मे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका आयपीएल स्पर्धेला (IPL 2021) देखील बसला. चार टीमचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफाला कोरनाची लागण झाली. त्यामुळे आयपीएल स्पर्धा 4 मे रोजी स्थगित करावी लागली. आयपीएल स्पर्धेतील ज्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली त्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सचे (CSK) बॉलिंग कोच एल. बालाजी (L. Balaji) आणि कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) स्पिनर वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) यांचा समावेश होता. हे दोघंही आता करोनामधून बरे झाले असून सध्या घरी आराम करत आहेत.  त्यांनी करोना व्हायरसमधून बरं होण्याचा अनुभव सांगितला आहे. कोरोनातून बरं होणे म्हणजे Man vs Wild चा एक भाग (episode) करण्यासारखं असल्याची भावना या दोघांनी व्यक्त केली आहे. 'त्या' वेळी घाबरलो होतो' बालाजीने सांगितले की, " मी 2 मे रोजी  थोडा अस्वस्थ होतो. मला अंगदुखी जाणवत होती. त्या दिवशी दुपारी माझी कोरोना चाचणी झाली. दुसऱ्या दिवशी मला कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट आला. तो रिपोर्ट पाहून मी घाबरलो होतो. मी आयपीएल बायो-बबलचे उल्लंघन केले नव्हते. तरीही माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. माझ्याबरोबर टीमचे आणखी दोन सदस्यांना करोनाची लागण झाली होती. आमचा रिपोर्ट फॉल्स आहे का? हे तपासण्यासाठी दुसऱ्या दिवशी पुन्हा टेस्ट झाली. त्यावेळी देखील माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर मला हॉटेलमधील दुसऱ्या मजल्यावर शिफ्ट करण्यात आले. मला सुरुवातीला काही कळाले नाही. आयसोलेशनमधील दुसऱ्या दिवशी मला आपण तब्येतीची काळजी घेतली पाहिजे हे जाणवले. त्यानंतर मी माझ्या हेल्थ रेकॉर्ड सुरु केला. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची देखील मला काळजी वाटत होती. त्यामध्ये चेतेश्वर पुजारा, दीपक चहर आणि रॉबिन उथप्पा यांचा समावेश होता. त्यानंतर माईक हसीला देखील कोरोनाची लागण झाल्याचे मला समजले. मला आणि हसीला 6 मे रोजी दिल्लीहून चेन्नईला शिफ्ट करण्यात आले. तिथे 24 तास आमच्या तब्येतीवर लक्ष होते. 12 दिवस हॉस्पिटलमध्ये घालवल्यानंतर 14 मे रोजी मी घरी परतलो." असे बालाजीने 'इएसपीएन क्रिकइन्फो' शी बोलताना सांगितले. इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहलीला धक्का, जवळच्या व्यक्तीचे निधन वरुण चक्रवर्तीने सांगितला अनुभव बालाजी प्रमाणेच केकेआरचा स्पिनर वरुण  चक्रवर्तीने देखील त्याचा अनुभव सांगितला आहे. "मला 1 मे रोजी थकवा जाणवत होता. त्याच दिवशी मला हलका ताप होता. माझी आरटी-पीसीआर टेस्ट झाली. त्या टेस्टचा रिपोर्ट येण्यापूर्वीच मला क्वारंटाईन करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मी घाबरलो होतो. आयसोलेशनमध्ये राहणे सोपे नव्हते. त्यामुळए माझा मुड ठिक करण्यासाछी मी वेब सीरज पाहत होतो. नातेवाईकांशी देखील व्हिडीओ कॉलने संपर्कात होतो. त्याचवेळी खाणे, औषध आणि अन्य आवश्यक गोष्टींची देखील काळजी घेत होतो. शाहरुख खानने देखील टीमच्या सर्व सदस्यांशी बोलून त्यांना धीर दिला. 'तो' असेपर्यंत मला....' महेंद्रसिंह धोनीबद्दल साहाचं मोठं वक्तव्य माझ्यावर अगदी योग्यवेळी उपचार झाल्यानं मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मी सर्वांचा आभारी आहे. त्याचबरोबर सर्व कोरोना पेशंट्स  लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना करतो." असे चक्रवर्तीने सांगितले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Csk, IPL 2021, KKR

    पुढील बातम्या