Home /News /sport /

IPL 2021 मध्ये टीम वाढवायची BCCI ची तयारी, पण फ्रॅन्चायजीपुढे या अडचणी

IPL 2021 मध्ये टीम वाढवायची BCCI ची तयारी, पण फ्रॅन्चायजीपुढे या अडचणी

आयपीएल (IPL)च्या पुढच्या मोसमात बीसीसीआय (BCCI) आणखी दोन टीमसाठी टेंडर काढण्याच्या तयारीत आहे. पण बीसीसीआयच्या या निर्णयामुळे सध्याच्या फ्रॅन्चायजींपुढे अनेक प्रश्न आणि मागण्या तयार होत असल्याचं चित्र आहे.

    मुंबई, 16 नोव्हेंबर : आयपीएल (IPL)च्या पुढच्या मोसमात बीसीसीआय (BCCI) आणखी एक किंवा दोन टीमसाठी टेंडर काढण्याच्या तयारीत आहे. पण बीसीसीआयच्या या निर्णयामुळे सध्याच्या फ्रॅन्चायजींपुढे अनेक प्रश्न आणि मागण्या तयार होत असल्याचं चित्र आहे. सध्याच्या 8 फ्रॅन्चायजीऐवजी 9-10 फ्रॅन्चायजी झाल्या तर आयपीएलचा पुढचा लिलाव मोठा होण्याचाही अंदाज आहे, पण टीम वाढल्या तर उत्कृष्ट टीम कशी बनावयची, ही चिंता फ्रॅन्चायजींना सतावत आहे. परदेशी खेळाडूंबाबत असलेल्या नियमांमुळे आधीच काही टीमना योग्य भारतीय खेळाडूंची निवड करता येत नाही, त्यामुळे त्यांचा संघर्ष सुरू आहे. आयपीएलच्या नियमांनुसार प्रत्येक टीमला कमीत कमी 8 परदेशी खेळाडू टीममध्ये ठेवणं गरजेचं आहे, यापैकी फक्त 4 खेळाडू अंतिम-11 मध्ये खेळू शकतात. जर टीमची संख्या 8 वरुन 10 झाली तर सर्वोत्तम खेळाडूंची निवड करण्यात अडचण येईल. आताच टीमना चांगले खेळाडू ठरवता येत नाहीत. बहुतेक आयपीएल टीमचे 7-9 खेळाडू निश्चित आहेत, तर 2-3 खेळाडू बदलले जातात. आयपीएलमध्ये जर 8 च्या 10 टीम झाल्या तर प्रतिभावान खेळाडूंची संख्या आणखी कमी होईल. सध्याच्या आयपीएल टीमनी त्यांचे सर्वोत्तम खेळाडू निश्चित केले आहेत. पण जर आणखी दोन टीम वाढल्या तर यातल्या प्रत्येक टीमला त्यांचे सर्वोत्कृष्ट खेळाडू गमवावे लागतील, याची भीती फ्रॅन्चायजीना वाटत आहे. टीमच्या या अडचणींवर मात करण्यासाठी बीसीसीआय परदेशी खेळाडूंच्या खेळवण्याची मर्यादा 4 वरुन 5 करु शकते. यामुळे बहुतेक टीमच्या अडचणी दूर होतील. टाईम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयच्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं, 'बहुतेक चांगले परदेशी खेळाडू बेंचवरच बसलेले असतात, कारण फक्त 4 परदेशी खेळाडूच खेळू शकतात. एका अधिकच्या परदेशी खेळाडूमुळे टीमचं संतुलन टिकून राहिल. आयपीएल अशी स्पर्धा आहे ज्यात स्थानिक खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी दिली जाते, त्यामुळे गव्हर्निंग काऊन्सिलला परदेशी खेळाडूंची संख्या वाढवण्याचा निर्णय घेणं सोपं नसेल.'
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या